Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शिवसेनेचं लग्न एकाशी, लफडं दुसऱ्याबरोबर’, मनसे नेते संदीप देशपांडे यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

सुपारी घेतल्याशिवाय मनसे काम करु शकत नाही. त्यावरच त्यांचं अस्तित्व अवलंबून असल्याचा घणाघात अनिल परब यांनी मनसेवर केला होता. त्यावर संदीप देशपांडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेनं हिंदुंच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, अशा शब्दात देशपांडे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.

'शिवसेनेचं लग्न एकाशी, लफडं दुसऱ्याबरोबर', मनसे नेते संदीप देशपांडे यांचा शिवसेनेवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 9:50 AM

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सुपारीबाज पक्ष असल्याची घणाघाती टीका शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केली आहे. त्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘शिवसेनेचं लग्न एकाशी आणि लफडं दुसऱ्याबरोबर’ असल्याची खोटक टीका देशपांडे यांनी केली आहे. मनसेनं जे केलं ते उघडपणे केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरची शिवसेना ही धोकेबाज सेना झाल्याचा हल्लाबोल देशपांडे यांनी केला आहे. (MNS leader Sandeep Deshpande criticize Shivsena and Anil Parab )

सुपारी घेतल्याशिवाय मनसे काम करु शकत नाही. त्यावरच त्यांचं अस्तित्व अवलंबून असल्याचा घणाघात अनिल परब यांनी मनसेवर केला होता. त्यावर संदीप देशपांडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेनं हिंदुंच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना स्वबळावर सत्ता आणणार असं सांगितलं होतं. पण आता राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्तेत बसले आहेत, अशा शब्दात देशपांडे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.

“भाजपसोबत जाण्याचा निर्णय मनसेनं घेतला नाही. शिवसेनेनं मनसेचे नगरसेवक चोरले. उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकांनी मनसेला प्रस्ताव दिला होता. शिवसेनेनं धोकेबाजी केल्यामुळे त्यावेळी युती झाली नाही. शिवसेनेचा जीव महापालिका रुपी पोपटामध्ये अडकला आहे. आज ‘कृष्णकुंज’चं महत्व वाढल्यामुळेच शिवसेनेच्या पोटात दुखत आहे”, अशी खोचक टीका देशपांडे यांनी केली आहे.

अनिल परब नेमकं काय म्हणाले होते?

“सुपारी घेतल्याशिवाय मनसे (MNS) कोणतंही काम करू शकत नाही. त्यावरच त्यांचं अस्तित्व अवलंबून आहे, अशा शब्दात अनिल परब यांनी मनसेवर टीका केली आहे. वेगवेगळ्या पक्षांची सुपारी घेऊन झालीच आहे. ज्या भाजप नेत्यांना लोकसभा नुवडणुकीत ‘लाव रे तो व्हडिओ’ दाखवून उघडं नागडं केलं. त्यांच्यासोबतच उघडे झोपले की काय परिस्थिती होते ते पुढे दिसेल”, असा घणाघात अनिल परब यांनी केला आहे.

वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन मनसे आक्रमक

वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन मनसे चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. 26 नोव्हेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मनसे आंदोलन करणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्याची मोहीमही मनसेनं हाती घेतली आहे. तर मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी पोस्टरद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेची खिल्ली उडवली आहे.

संबंधित बातम्या:

सुपारी घेतल्याशिवाय मनसे कामच करू शकत नाही, त्यावरच त्यांचं अस्तित्व अवलंबून; अनिल परब यांचा घणाघात

‘असंच काम करा, आम्हाला बोलावं लागणार नाही’, मनसे आमदार राजू पाटलांचा टोला

MNS leader Sandeep Deshpande criticize Shivsena and Anil Parab

VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक.
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं...
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं....
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं.
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका.
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन.
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक.
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?.