“माणुसकीचा फ्रीज”, घरातील अतिरिक्त खाद्य द्या, भुकेल्यांनी घेऊन जा, मनसेचा अभिनव उपक्रम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उपाशीपोटी झोपणाऱ्या लोकांसाठी मुंबईतील काही भागात "माणुसकीचा फ्रीज" हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे उपाशीपोटी झोपणाऱ्या लोकांची भूक भागवण्याचा प्रयत्न मनसेकडून होत आहे.

माणुसकीचा फ्रीज, घरातील अतिरिक्त खाद्य द्या, भुकेल्यांनी घेऊन जा, मनसेचा अभिनव उपक्रम
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 11:05 AM

मुंबई: लाखो लोकांना दोन वेळचं अन्न देणाऱ्या मुंबईसारख्या शहरात हजारो लोक उपाशीपोटी झोपतात. हाती काम नाही किंवा माणसिक आजाराने ग्रस्त असलेले अनेक लोक आपल्याला मुंबईत उपाशी असलेले पाहायला मिळतात. काही संवेदनशील लोक त्यांना अन्न देतातही. पण आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उपाशीपोटी झोपणाऱ्या लोकांना “माणुसकीचा फ्रीज”द्वारे काहीसा आधार देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. (MNS launches humanitarian freeze initiative for starving people)

कुणीही उपाशीपोटी झोपू नये या हेतूने मनसेकडून ‘माणुसकीचा फ्रीज’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत माहिमधील शितलादेवी मंदिर मार्ग परिसरातील पिंटो मॅन्शन येथे मनसेच्या कार्यालयात या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. गरीमा फाऊंडेशन, आपलं माणूस प्रतिष्ठान आणि NESHच्या सहकार्यानं मनसेकडून हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली आहे.

‘कोणीही उपाशी पोटी झोपू नये या प्रामाणिक भावनेने आम्ही एक उपक्रम सुरु करत आहोत. आमच्या माहीम आणि दादरच्या कार्यालयात एक फ्रीज ठेवणार आहोत. नागरिकांनी आपल्या घरातील अतिरिक्त अन्न, फळे, ब्रेड, बिस्कीट किंवा अन्य कोणत्याही खाण्यायोग्य वस्तू या फ्रीजमध्ये आणून ठेवाव्यात. जो भुकेला असेल त्याने हे पदार्थ घेऊन जावेत’, अशी ही संकल्पना असल्याचं नितीन सरदेसाई यांनी सांगितलं आहे.

‘माणुसकीचा फ्रीज’ हा उपक्रम सुरु केल्यानंतर मनसेकडून एक चित्रफित जारी करण्यात आली आहे. त्यामध्ये नितीन सरदेसाई यांनी या उपक्रमाची माहिती दिली आहे. त्याचबरोबर भुकेले लोक या फ्रीजमधून खाण्यासाठी अन्न घेऊन जात असल्याचंही या चित्रफितीत पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियावरही या उपक्रमाला मोठी दाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या:

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात फोनवर संवाद!, राज्यपालांच्या भेटीबाबत चर्चा

राज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान; राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

राज्यपाल म्हणाले पवार साहेबांशी बोलून घ्या : राज ठाकरे

MNS launches humanitarian freeze initiative for starving people

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.