BMC Election 2022 Ward 157 : शिवसेनेचा बालेकिल्ला पुन्हा अबाधित राहणार? वॉर्ड क्रमांक 157 ची हवा कुणाच्या बाजूने? वाचा
वॉर्ड क्रमांक 157 ची परिस्थितीही काहीशी अशीच राहिली आहे. गेल्या निवडणुकीत या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवार अकांक्षा शेट्टे यांचा थोडक्या मतांनी विजय झाला होती. त्यामुळे यावेळची निवडणूकही त्यांच्यासाठी आव्हानात्मक आहे.
मुंबई : सगळीकडे बीसीएमसी निवडणुकीची (BMC Election 2022) चर्चा आहे. शिवसेना (Shivsena) आणि भाजपच्या (BJP) अटीतटीच्या लढतीचं पालिकेतलं चित्र यावेळीही काय दिसतं आहे. तीन दशकांपासून पालिक शिवसेना सत्तेवर विराजमान होती. तसेच राज्याच्या राजकारणातही मुख्यमंत्रीपदामुळे शिवसेनेचे वजन हे चांगलेच वाढले आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी ही निवडणूक आणखी प्रतिष्ठीचे बनली आहे. तर सेनेला यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ लाभली. मागच्या निवडणुकीतलं चित्र मात्र वेगळ होतं, कारण सर्वच राजकीय पक्ष वेगळे लढल्याने मतांचे विभाजन हे चांगलेच झाल्याचे दिसून आले. त्याचा काही प्रमाणातक होईना तोटा हा सर्वच राजकीय पक्षांना झाला. शिवसेनेलाही केवळ निसरता विजय मिळवता आला. वॉर्ड क्रमांक 157 तुर्भे रोड, चांदवली लेकची परिस्थितीही काहीशी अशीच राहिली आहे. गेल्या निवडणुकीत या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवार अकांक्षा शेट्टे यांचा थोडक्या मतांनी विजय झाला होती. त्यामुळे यावेळची निवडणूकही त्यांच्यासाठी आव्हानात्मक आहे.
कसं होतं मतांचं बलाबल?
वॉर्ड क्रमांक 157 मध्ये शिवसेना हा विजय मिळवत सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरला होता. आकांक्षा शेट्टे यांना या ठिकाणी 7349 मतं मिळाली होती आणि त्यांचा निर्विवाद विजय झाला. तर दुसऱ्या क्रमांकावर अपेक्षेप्रमाणे या ठिकाणी काँग्रेचा उमेदवार राहिला आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला या ठिकाणी जळपास साडेसहा हजार मतं मिळाली होती. तर सहाजिक या ठिकाणी भाजपच्या उमेदवारांनेही चांगलीच टक्कर दिली होती. भाजपच्या उमेदवाराला या ठिाकणी सहा हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली होती. त्यामुळे या ठिकाणीच निवडणूक ही शिवसेनेसाठी सोपी राहिली नव्हती.
निवडणुकीतली आकडेवारी
पक्ष | उमेदवार (Candidate) | विजयी/आघाडी (Win/Lead) |
---|---|---|
शिवसेना | निधी प्रमोद शिंदे | 4,485 मतं |
भाजप | रुक्मिणी विठ्ठल खरटमोल | 3,256 मतं |
काँग्रेस | उषा अनिल कांबळे | 1,333 मतं |
राष्ट्रवादी | रेशा मधुकर शिससाट | 1,716 मतं |
मनसे | शोभा अशोक शानभाग | 1,009 मतं |
अपक्ष/ इतर |
अशा आहेत वॉर्डच्या सीमा
या वॉर्डमध्ये मोठा आणि महत्वाचा भाग समाविष्ठ आहे. रहेजा विहार सर्कुलर रोड आणि ‘एल’ आणि ‘एस’ वॉर्डांच्या सीमारेषेपासून सुरू होणारी आणि ‘एल’ आणि ‘एस’ वॉर्डांच्या सामायिक सीमारेषेच्या दक्षिण बाजूने आणि पश्चिम बाजूने पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे जाणारी लाईन कॉमन बाऊंडरीच्या जंक्शनपर्यंत. ‘एल’ आणि ‘एन’ प्रभागातील; तेथून उक्त सामाईक सीमेच्या पश्चिम बाजूने दक्षिणेकडे खेराणी रोड पयंत; तेथून खेराणी रोडच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे नाहर अमृतशक्ती रोडपयंत; तेथून नाहर अमृतशक्ती रोडच्या पूर्व बाजूने उत्तरेकडे चांदिवली फार्म रोडपयंत; तेथून चांदिवली फार्म रोडच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे रहेजा विहार सर्कुलर रोड पयंत; तेथून रहेजा विहार सर्कुलर रोडच्या पूर्व बाजूने उत्तरेकडे ‘L’ आणि ‘S’ वॉर्डांच्या मध्येपर्यंत, अशा या वॉर्डच्या सीमा आहेत.