BMC Election 2022 Amboli Ward 65 : आंबोली वार्ड क्रमांक 65 मध्ये विद्यमान नगरसेवकासमोर मोठं आव्हान! वार्ड खुला झाल्यानं इच्छुकांची संख्या वाढणार

के वेस्ट वार्ड क्रमांक 65 मधून 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या अल्पा अशोक जाधव या विजयी झाल्या होत्या. त्यावेळी हा वार्ड ओबीसी महिलेसाठी आरक्षित होता. मात्र, ओबीसी आरक्षणाशिवाय महापालिका आरक्षण सोडत जाहीर करण्यात आल्यामुळे हा वार्ड खुला झाला आहे.

BMC Election 2022 Amboli Ward 65 : आंबोली वार्ड क्रमांक 65 मध्ये विद्यमान नगरसेवकासमोर मोठं आव्हान! वार्ड खुला झाल्यानं इच्छुकांची संख्या वाढणार
बीएमसी वार्ड क्रमांक 65 आंबोलीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 12:03 AM

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकीच्या (Municipal Election) पार्श्वभूमीवर जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली आहे. त्यात अनेकांचे वार्ड आरक्षित झाले आहेत तर अनेक नगरसेवकांचे वार्ड सुरक्षित राहिल्यानं त्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. तर वार्डाची आरक्षण (Ward Reservation) सोडत जाहीर झाल्यापासून विद्यमान नगरसेवकांसह (Corporators) इच्छुकांचीही धावपळ पाहायला मिळत आहे. के वेस्ट वार्ड क्रमांक 65 मधून 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या अल्पा अशोक जाधव या विजयी झाल्या होत्या. त्यावेळी हा वार्ड ओबीसी महिलेसाठी आरक्षित होता. मात्र, ओबीसी आरक्षणाशिवाय महापालिका आरक्षण सोडत जाहीर करण्यात आल्यामुळे हा वार्ड खुला झाला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अल्पा अशोक जाधव यांच्यासमोर नवं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.

2017 च्या निवडणुकीत काय घडलं?

2017 च्या महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढली होती. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांसह मनसे आणि अन्य पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे 2017 ची महापालिका निवडणूक अधिक रंगतदार झाली होती. त्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 65 मधून काँग्रेसच्या अल्पा अशोक जाधव विजयी झाल्या होत्या.

कुणाला पराभव स्वीकारावा लागला?

काँग्रेस नगरसेविका अल्पा अशोक जाधव यांनी 2017 च्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला होता. त्यांनी शिवसेनेच्या आयरे नूतन प्रसाद, भाजपच्या माया संतोष राजपूत, एमआयएमच्या अल्मास कुरेशी, मनसेच्या अवंतिका विलास राऊत यांचा पराभव केला होता.

वार्ड क्रमांक 65 ची सीमा काय?

वार्ड क्रमांक 65 च्या उत्तरेला वार्ड क्रमांक 64 (सिझर रोड), पूर्वेला वार्ड क्रमांक 77 (वेस्टर्न रेल्वे लाईन), दक्षिणेला वार्ड क्रमांक 66 (जे.पी. रोड, विठ्ठल भाई पटेल रोड), तर पश्चिमेला वार्ड क्रमांक 67 (दादाभाई नगर रोड, वीरा देसाई रोड) आहे.

वार्डाची लोकसंख्या किती ?

वार्ड क्रमांक 65 ची एकूण लोकसंख्या 54 हजार 281 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 हजार 424, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 173 इतकी आहे.

महापालिका निवडणूक निकाल 2017 पक्षनिहाय (bmc election result 2017 winner)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

कोणत्या उमेदवाराला किती मतं?

आयरे नूतन प्रसाद – शिवसेना – 5833 अगवान बिदुल कादर – भाकप (मार्क्सवादी) – 406 अल्पा अशोक जाधव – काँग्रेस – 7820 अल्मास कुरेशी – एमआयएम – 1178 माया संतोषसिंग राजपूत – भाजप – 6515 अवंतिका विलास राऊत – मनसे – 589

वॉर्ड आरक्षित की खुला?

महापालिका प्रशासनाने 2022च्या पालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत नुकतीच जाहीर केलीय. 2017 च्या निवडणुकीत हा वार्ड ओबीसी महिलासाठी राखीव होता. मात्र, आताची सोडत ओबीसी आरक्षणाशिवाय काढण्यात आली आहे. त्यामुळे हा वार्ड या निवडणूक खुला झाला आहे. त्यामुळे अल्पा अशोक जाधव यांच्यासमोर नवं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.