BMC Election 2022 B Ward 223 : उमरखाडीत कोणीची सत्ता? मुंबई महापालिकेतल्या 223 वॉर्डात काँग्रेस राखणार गड?
वॉर्ड 223मध्ये एकूण नऊ उमेदवार रिंगणात होते. प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढला होता. यात काँग्रेसने बाजी मारली. तर शिवसेना आणि एमआयएम अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) निवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्षाचे उमेदवार आपणच निवडून येणार, असा दावा करीत आहेत. वॉर्ड क्रमांक 223मध्ये मागील निवडणुकीत म्हणजेच 2017ला काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले होते. काँग्रेससह शिवसेना आणि एमआयएम या तीन पक्षांची चलती या वॉर्डात दिसून आली होती. काँग्रेसच्या (Congress) निकीता ज्ञानराज निकम यांना शिवसेनेच्या आशा परमेश मामिडी आणि एमआयएमच्या वकरुनिसा जाहीद हुसैन अन्सारी यांनी आव्हान उभे केले होते. यावेळीही विजय काँग्रेसच्या उमेदवाराचा होतो, की एमआयएम (AIMIM) आणि शिवसेना त्यांना धोबीपछाड देते किंवा तिसराच कोणीतरी उमेदवार विजयी होतो, हो थोड्याच दिवसांत कळणार आहे. सध्या तरी सर्वच पक्ष कामाला लागले असून आपला उमेदवार कसा निवडून येईल, यासाठीच्या प्रयत्नात आहेत.
उमेदवार आणि मिळालेली मते –
अन्सारी वकरुनिया जाहीद हुसैन (एमआयएम) – 4887
सुरेखा पांडुरंग बढे (मनसे) – 793
अलमास यासिन भट्टी (अपक्ष) – 48
शर्मिन मोहम्मद इरफान डोसा (राष्ट्रवादी) – 218
इद्रिस रेश्मा मोहम्मद नबी (अपक्ष) – 26
कादरी शमीम सय्यद फक्रुद्दीन (अपक्ष) – 30
आशा परमेश मामिडी (शिवसेना) – 5442
निकीता ज्ञानराज निकम (काँग्रेस) – 8634
निदा फातिमा शाहीद अहमद शेख (समाजवादी पार्टी) – 1376
कोणाला किती मते?
वॉर्ड 223मध्ये एकूण नऊ उमेदवार रिंगणात होते. प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढला होता. यात काँग्रेसने बाजी मारली. तर शिवसेना आणि एमआयएम अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिले. सर्वात जास्त मतदान काँग्रेसच्या उमेदवार निकीता निकम यांना 8634 तर सर्वात कमी इद्रिस रेश्मा मोहम्मद नबी या अपक्ष उमेदवारास 26 इतके मिळाले. नोटाला याठिकाणी 631 मते मिळाली. या वॉर्डात एकूण मतदार 45,025 असून एकूण वैध मते 22085 पडलेली पाहायला मिळाली.
वॉर्ड कुठून कुठपर्यंत?
उमरखाडी, प्रिन्सेस डॉक, वाडी बंदर