मुंबईः BMC Election2022 | ward 12| आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर कुणाची सत्ता येते अनेक आर्थिक गणितं अवलंबून असतात. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या(Mumbai Municipal Corporation) निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शिवसेना आणि भाजपमधील द्वंद्व यानिमित्ताने अधिकच चव्हाट्यावर आलेलं आहे. या सर्वांचे परिणाम महापालिका निवडणुकीच्या मतदानावर होणार हे नक्की. मागील वेळी मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 12 (ward Number 12) मध्ये शिवसेनेची सत्ता होती. बोरीवली नॅशनल पार्कसारख्या पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मतरदारसंघावर शिवसेनेच्या गीता संजय सिंघन यांचा मागील निवडणुकीत विजय झाला होता. भाजप आणि मनसेच्या उमेदवाराला गीता सिंघन (Geeta Singhan) यांनी चांगलीच धुळ चारली होती. यंदादेखील शिवसेनेचा उमेदवार हा गड राखणार का, की भाजपचं पारडं जड होणार, याचे आडाखे बांधले जात आहेत. मागील निवडणुकीत सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. आता महापालिकेची आरक्षण सोडत निघाली असून विविध वॉर्डांची स्थिती स्पष्ट झाली आहे. वॉर्ड क्रमांक 12 हा खुल्या प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आला आहे.
महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 12 मध्ये बोरीवली नॅशनल पार्क, कुलूपवाडी टाटा पॉवर हाऊस, मगाठाणे बस डेपो, आदी भाग येतो. मागील निवडणुकीत शिवसेना उमेदवाराला या भागातील मतदारांनी निवडून दिलं होतं.
वॉर्ड क्रमांक 12- बोरिवली- नॅशनल पार्क
2011 मधील जनगणनेनुसार वॉर्ड नंबर 12 मध्ये सुमारे 58 हजार 692 एवढी लोकसंख्या आहे. तर अनुसूचित जातीचे 910 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 420 एवढी आहे.
महापालिकेतील वॉर्ड क्रमांक 12 हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आला आहे.
सुधीर फडके उड्डाण पूल व पश्चिम रेल्वे लाइनच्या जंक्शनपासून पश्चिम बाजूने लोकमोन्य टिळक रोडपर्यंत, डॉ. श्याम प्रसाद चौक, दत्तपाडा रोड, बोरसपाडा रोड, देरासार लेन, देवनगर, हरिदास नगर,, एसपीएम पार्क, रामदास सूत्राळे जंक्शनपर्यंत. उषा नगर रोड, प्रेमनगर रोड, देवीदास रोड, सुधीर फडके उड्डाण पूल, विवेकानंद नगर, पोईसर बस डेपो या प्रमुख ठिकाणे वस्ती किंवा नगरांचा समावेश होतो.
महापालिका निवडणूक निकाल 2017 पक्षनिहाय (bmc election result 2017 winner)
पक्ष (Party) | उमेदवार (Candidate) | विजयी/आघाडी |
---|---|---|
शिवसेना | गीता सिंघन | विजयी उमेदवार |
भाजप | विक्रम चोगले | - |
काँग्रेस | हेमंत पांडे | - |
राष्ट्रवादी काँग्रेस | अजय देसाई | - |
मनसे | शिवानी पवार | - |
अपक्ष-इतर | - | - |