BMC Election 2022 Kachpada Ward 47 | भाजपाच्या खिशातील वॉर्ड क्रमांक 47! काँग्रेस-शिवसेनेची कुरघोडी होणार का?

2017 मध्ये या मतदार संघातून भाजपच्या श्रीमती जया सतनामसिंग तिवाना यांनी निवडणूक जिंकली होती. काँग्रेसच्या पिंकी भाटियांना टक्कर देत त्यांनी नगरसेवक पदाची खुर्ची पटकावली होती.

BMC Election 2022 Kachpada Ward 47 | भाजपाच्या खिशातील वॉर्ड क्रमांक 47! काँग्रेस-शिवसेनेची कुरघोडी होणार का?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 5:43 PM

मुंबईः BMC Election2022 | ward 47 | मुंबई महापालिका निवडणुकीचे (BMC Election) पडघम वाजू लागलेत. अवघ्या राज्याचं लक्ष लागलेली मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या सप्टेंबर महिन्यात होत आहे. भाजप आणि शिवसेनेतील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. शिवसेनेचा गड (ShivSena) समजल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर यंदा भागवा फडकणार का, याचं उत्तर येत्या काही महिन्यात मिळेलच. प्रत्येक वॉर्डनिहाय निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. वॉर्ड क्रमांक 47 मधील मतदारही कुणाला मतदान करतील, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 2017 च्या निवडणुकीत या वॉर्डावर भाजपने सत्ता मिळवली होती. काँग्रेसच्या उमेदवाराला धूळ चारत जया सतनामसिंग तिवाना (Jaya Satnamsingh Tiwana) यांनी नगरसेवक पदाची खुर्ची पटकावली होती. आता आगामी निवडणुकीत भाजपला आपलं पद टिकवून येईल का? की वेगळी राजकीय गणितं आखून शिवसेना या जागेवर भगवा फडकवेल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. काँग्रेस पक्षाचाही प्रभाव या मतदारसंघावर आहे. त्यामुळे शिवसेना, भाजप आणि काँग्रेस अशा तीन पक्षात चुरशीची लढत होण्याची चिन्ह आहेत.

मागील विजयी उमेदवार कोण?

2017 मध्ये या मतदार संघातून भाजपच्या श्रीमती जया सतनामसिंग तिवाना यांनी निवडणूक जिंकली होती. काँग्रेसच्या पिंकी भाटियांना टक्कर देत त्यांनी नगरसेवक पदाची खुर्ची पटकावली होती.

मागील वेळी कुणाला किती मतं?

  •  श्रीमती जया सतनामसिंग तिवाना- भाजपा- मालाड पश्चिम-9301
  • पिंकी भाटिया- काँग्रेस- 7486
  • सुप्रिया विजय पवार- शिवसेना 3463
  • मनसे- शीतल चौधरी- 545
  • वेंकट जोसेफिन अपक्ष-672
  • पूजा गणेश होनावर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- 57
  • जी व्ही पिल्ले- अपक्ष- 56
  • एस राजमणी सुब्रमण्यम- एआयडीएमके- 238
  • एकूण मतदार-40,012
  • वैध मते- 21,863

वॉर्डमधील महत्त्वाचे भाग?

काच पाडा, एव्हर शाईन नगर, गोरेगाव स्पोर्ट क्लब परिसर ही प्रमुख ठिकाणं वॉर्ड क्रमांक 47 मध्ये येतात.

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?

नहारनगर, भंडारवाडा मार्ग, चिंचोली बंदर रोड, न्यू लिंक रोड, एमडीपी रोड, पोईसर नदी, एव्हरशाईन नगर, अटलांटा इमारत, न्यू लिंक रोड, फादर जस्टीन रोड, चुन्नीलाल गिरीधारी लाल पटेल मार्ग आदी भाग या वॉर्डात समाविष्ट होतो.

वॉर्ड आरक्षित की खुला?

यंदा मुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाली असून, त्यानुसार वॉर्ड क्रमांक 47 हा खुल्या प्रवर्गातून निश्चित करण्यात आला आहे.

वॉर्डाची लोकसंख्या किती?

2011 मधील जनगणेनुसार, वॉर्ड क्रमांक 47 मधील एकूण लोकसंख्या 51 हजार 438 एवढी आहे. तर 2,347 एवढी अनुसुचित जाती व   393 ही अनुसुचित जमातीतील लोकांची संख्या आहे.

महापालिका निवडणूक निकाल 2017 पक्षनिहाय (bmc election result 2017 winner)

पक्ष (Party)उमेदवार (Candidate)विजयी/ आघाडी
भाजपाजया सतनामसिंग तिवानाविजयी उमेदवार
काँग्रेसपिंकी भाटिया-
शिवसेनासुप्रिया विजय पवार-
मनसेशीतल चौधरी-
राष्ट्रवादी काँग्रेसपूजा होनावार-
अपक्ष/ इतर--
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.