BMC Election 2022 Ward 158 : कोरोनाकाळलातलं काम गाजलं, पुन्हा निवडून येणार? वॉर्ड क्रमांक 158 ची राजकीय परिस्थिती काय?

कोरोनाकाळातही मुंबई महापालिकेचा मुंबई पॅटर्न हा जगभर गाजला. तर मुंबईतल्या काही नगरसवेकांचं कामही चर्चेत राहिलं. वॉर्ड क्रमांक 158 ची स्थितीही अशीच होती. शिवसेना नगरसेवक चित्रा सांगळे वॉर्ड क्र. 158 मध्ये लॉकडाऊनच्या संकटात मदतीसाठी पुढे आल्याचे दिसून आले.

BMC Election 2022 Ward 158 : कोरोनाकाळलातलं काम गाजलं, पुन्हा निवडून येणार? वॉर्ड क्रमांक 158 ची राजकीय परिस्थिती काय?
वॉर्ड क्रमांक 158 ची राजकीय परिस्थिती काय?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 7:00 PM

मुंबई : सध्या सगळीकडे महापालिकच्या निवडणुकीच (BMC Election 2022) हवा आहे. या निवडणुकीबाबत वॉर्ड टू वॉर्ड माहिती आम्ही तुम्ही उपलब्ध करून देत आहोत. वॉर्ड क्रमांक 157 (Ward 158) टिळक नगर, म्हाडा मैदान, साकी नाका पोलीस ठाणे या परिसराचा सध्या आपण आढावा घेत आहोत. गेल्या निवडणुकीत हा गड पुन्हा शिवसेने सहज जिंकला होता. मात्र मागील दोन अडीच वर्षे ही सर्वांचीच परीक्षा घेणारी राहिली आहेत. जगाने गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या महाकाय संकटाचा सामना केला आहे. सहाजिकच त्याचा परिणाम हा मुंबईवरही झाला. मात्र कोरोनाकाळातही मुंबई महापालिकेचा मुंबई पॅटर्न (Mumbai Pattern) हा जगभर गाजला. तर मुंबईतल्या काही नगरसवेकांचं कामही चर्चेत राहिलं. वॉर्ड क्रमांक 158 ची स्थितीही अशीच होती. शिवसेना नगरसेवक चित्रा सांगळे वॉर्ड क्र. 158 मध्ये लॉकडाऊनच्या संकटात मदतीसाठी पुढे आल्याचे दिसून आले. त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीतही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गेल्या निवडणुकीत कुणाला किती मतं?

गेल्या निवडणुकीत या ठिकाणी शिवसेनेच्या नगरसेवकाला 9696 मतं मिळाली होती. तर तर भाजपच्या रश्मी चिरंदकर यांना 5197 मतांवर समाधान मानत पराभव पत्करावा लागला होता. तर कांग्रेसची गाडी या मतदारसंघात पाच हजारांच्या आतच अडकली होती. कांग्रेसचे श्रीकांत मौर्य यांना 4819 मतं मिळाली होती. या ठिकाणी कमी उमेदवार मैदानत असल्याचा फायदाही शिवसेनेला झाला. कारण सहाजिकच मतांचे विभाजन हे टळले होते. यंदा मात्र या ठिकाणी परिस्थिती वेगळी आहे. या ठिकाणी यंदा महाविकास आघाडीचं पाठवळं हे शिवसेनेच्या मागे असणार आहे.

यंदाची निवडणुकीतली आकडेवारी काय सांगते?

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनानिधी प्रमोद शिंदे 4,485 मतं
भाजपरुक्मिणी विठ्ठल खरटमोल3,256 मतं
काँग्रेसउषा अनिल कांबळे 1,333 मतं
राष्ट्रवादीरेशा मधुकर शिससाट1,716 मतं
मनसेशोभा अशोक शानभाग1,009 मतं
अपक्ष/ इतर

पावसाळा पूर्व कामांचा आढावाही चर्चेत

या ठिकाणच्या शिवसेना नगरसेवकांनी घेतलेला पावसाळ्यापूर्वीचा आढावा आणि विकास कामांचा आढावाही चर्चेत राहिला. मुंबई महानगर प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांसाठी रस्ते आणि पुलांच्या देखभालीसह पावसाळा सुरू होण्यापूर्वी देखभाल दुरुस्तीची सर्व कामे पूर्ण करावीत, जेणेकरून लोकांना यातून मजुरांची समस्या उद्भवू नये आणि मजुरांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली होती. तर सर्व कामात त्यांच्या प्रभागातील जनता साथ देत आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.

कोरोनाकाळातल्या कामाचीही चर्चा

कोरोनाकाळात राज्यसह त्यांनी चालवलेली माहीम “घरी राहा सुरक्षित राहा”, हीसुद्ध बरीच चर्चेत राहिली. जर तुम्ही याची अंमलबजावणी केली तर पूर्वीची स्थिती पूर्ववत होण्यास फायदा होईल, असे सांगत जनतेची साथ मिळवण्यात ते यशस्वी झाल्याचे दिसून आले. कोरोनाकाळात त्यांनी महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले आणि बीएमसीच्या कामाबाबतही समाधान व्यक्त केले होते.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.