BMC election 2022 Ward No 183 Dharavi Bus Depot : काय लागणार धारावी बस डेपोचा निकाल; आरक्षण बदलेले, यंदा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षीत
2017 च्या निवडणूकीत हा वॉर्ड महिला ओबीसीसाठी आरक्षीत झाला होता. त्यावेळी शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, नँशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी बहुजन समाजपार्टी आणि अपक्षांनी आपले नशीब आजमावले होते.
BMC election 2022 : सध्या राज्यात राज्यसभेच्या 6 जागांवरून राज्याती सत्ताधारी आणि विरोधकांत चांगलीच लागली आहे. तर यानंतर विधानपरिषद ही लागणार आहे. तर त्यानंतर राज्यातील मिनी मंत्रालय समजणाऱ्या जाणाऱ्या महापालिकांच्या (municipal election) रणधुमाळीला सुरूवात होईल. त्यामुळे निवडणूकांचा बिगुल हा राज्यात आता वाजतच राहणार आहे. त्यातच मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीवरून (BMC election 2022) महाविकास आघाडी सरकारमधील मित्र पक्ष शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी कंबर कसली आहे. तर भाजप आम्ही एकटे मैदान मारू असे म्हणत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत कोणाचा झेंडा लागणार यावर सध्या राज्यातील जनता बोलताना दिसत आहे. तर मुंबई महापालिकेच्या निवडणूकावरून धारावी बस डेपो (Dharavi Bus Depot Ward 183) म्हणजेच वॉर्ड क्रमांक 183 मध्ये काय होणार याकडेही प्रभागील नागरिकांचे बारकाईने लक्ष आहे.
दरम्यान मुंबई महापालिकेच्या या निवडणूकीच्या रणधुमाळीत आरक्षण सोडत झाल्याने अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले आहे. तर अनेकांना आपला प्रभाग सोडून दुसरा शोधावा लागणार आहे. असेच काहीसे धारावी बस डेपो म्हणजेच वॉर्ड क्रमांक 183 मध्ये झाले आहे. गेल्या निवडणूकीत म्हणजेच 2017 च्या निवडणूकीत हा वॉर्ड महिला ओबीसीसाठी आरक्षीत होता. मात्र यावेळी हा सवर्साधारण म्हणून खुला झाला आहे. त्यामुळे येथील 2017 मध्ये निवडूण आलेल्या काँग्रेसच्या नगरसेविका गंगा कुणाल माने यांना एकतर आपल्यासाठी दुसरा प्रभाग शोधावा लागेल किंवा याच वॉर्डात सवर्साधारण मधून निवडणूकीला सामोरं जावं लागेल. त्यामुळे काय होणार या धारावी बस डेपो वॉर्डात हे निवडणूकीचा निकाल लागल्यानंतरच कळेल.
पक्ष | उमेदवार (Candidate) | विजयी/आघाडी (Win/Lead) |
---|---|---|
शिवसेना | कटके उर्मिला राहुल | |
भाजप | भाग्यश्री श्रीकृष्ण वेंगुर्लेकर | |
राष्ट्रवादी काँग्रेस | हिना मौला शेख | |
काँग्रेस | माने गंगा कुणाल | माने गंगा कुणाल |
मनसे | - | |
अपक्ष / इतर | अन्सारी झैबुननिसा साजिद |
महापालिका निवडणूक निकाल 2017 पक्षनिहाय उमेदवार
2017 च्या निवडणूकीत महिला ओबीसी
2017 च्या निवडणूकीत हा वॉर्ड महिला ओबीसीसाठी आरक्षीत झाला होता. त्यावेळी शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, नँशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी बहुजन समाजपार्टी आणि अपक्षांनी आपले नशीब आजमावले होते. मात्र बाजी काँग्रेसच्या उमेदवार गंगा कुणाल माने यांनी मारली. त्यावेळी त्यांनी 3893 मते घेऊन आपले नाव नगरसेवक पदावर कोरले होते.
वॉर्ड क्रमांक 183 परिसर (रुपारेल कॉलेज – माटुंगा कार्यशाळा)
धारावी बस डेपो, सायन वांद्रे लिंक रोड, नाईक नगर, नेचर पार्क
वार्ड क्र. 183 सीमा
पश्चिम रेल्वे मार्ग आणि मुंबई शहराच्या उत्तर सीमांच्या जंक्शनपासून सुरू,
मुंबई शहराच्या उत्तर सीमांच्या बाजूने पूर्वेकडे, लालबहादूर शास्त्री मार्ग ओलांडून मध्य रेल्वे लाईन्सच्या जंक्शनपर्यंत;
मध्य रेल्वे लाईन्सने दक्षिणेकडे सायन फ्लायओव्हर ब्रिज येथील संत रोहिदास मार्ग (धारावी रोड) पर्यंत;
संत रोहिदास मार्ग आणि मुत्तुराम लिंगम तेवार मार्ग (माहीम – सायन लिंक रोड) च्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे पश्चिम रेल्वे लाईनसात माहीमपर्यंत;
पश्चिम रेल्वे मार्गाने उत्तरेकडे मुंबई शहराच्या उत्तरेकडील सीमांपर्यंत
एकूण लोकसंख्या आणि मतदार
2017 च्या निवडणूकीत या वार्डाची एकूण लोकसंख्या 49050 इतकी होती. ज्यात SC 8806 आणि ST 524 होते. तर एकूण मतदार 27160 झाले होते. तर त्यावेळी NOTA ला 208 मते पडली होती. तर 2 मते बाद झाली होती.
महापालिका निवडणूक निकाल 2017 पक्षनिहाय उमेदवार
कटके उर्मिला राहुल शिवसेना 3859
माने गंगा कुणाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 3896
हिना मौला शेख नँशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी 718
भाग्यश्री श्रीकृष्ण वेंगुर्लेकर भारतीय जनता पार्टी 2303
धायगुडे उत्कर्षा लाला बहुजन समाजपार्टी 2942
अन्सारी झैबुननिसा साजिद अपक्ष 137