BMC Election 2022 Ward 97 : साताक्रूझमधील दबदबा भाजप राखणार? वॉर्ड क्रमांक 97 मधलं चित्र हेतल गालांसाठी कसं?

गेल्या निवडणुकीत हेतल गाला यांनी शिवसेनेच्या सुनिल मोरे आणि काँग्रेसचे नेते अर्जुन सिंह तसेच मनसेचे विजय काते यांचा दारून पराभव केला होता, त्यामुळे भाजपने हा गड सहज काबीज केला. गेली महापालिका ही पंचरंगी लढत होती, कारण सर्वच राजकीय पक्ष हे वेगळे लढले होते.

BMC Election 2022 Ward 97 : साताक्रूझमधील दबदबा भाजप राखणार? वॉर्ड क्रमांक 97 मधलं चित्र हेतल गालांसाठी कसं?
साताक्रूझमधील दबदबा भाजप राखणार? Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 6:56 PM

मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC Election 2022)निकालात सांताक्रुझचे काही वॉर्ड हे नेहमीच निर्णयक ठरले आहेत. त्यातल्या त्यात सांताक्रूझमधील वॉर्ड क्रमांक- 97 (Ward 97)हा सर्वांचे लक्ष वेधून घेणारा वॉर्ड, तसेच कोरोनाकाळात सर्वात जास्त चर्गेत राहिलेला वॉर्ड आहे. त्यामुळे यावेळी या वॉर्डवरती सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच सांताक्रूझमध्ये आलेल्या योजनाही चर्चेत राहिल्या आहेत. अग्निशमन दलाने सांताक्रूझच्या स्थानिक नगरसेविका हेतल गाला (Hetal Gala) यांच्या प्रयत्नाने मिनी फायर स्टेशन सुरू केले आहे, या योजनेचा हेतल गाला यांनी तीन वर्षांहून अधिक काळ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता.2017 ला या वॉर्डमध्ये भाजपच्या हेतल गाला यांनी मोठा विजय प्राप्त केला. गेल्या निवडणुकीत हेतल गाला यांनी शिवसेनेच्या सुनिल मोरे आणि काँग्रेसचे नेते अर्जुन सिंह तसेच मनसेचे विजय काते यांचा दारून पराभव केला होता, त्यामुळे भाजपने हा गड सहज काबीज केला. गेली महापालिका ही पंचरंगी लढत होती, कारण सर्वच राजकीय पक्ष हे वेगळे लढले होते.

भाजप पुन्हा हा गड काबीज करणार?

गेल्या निवडणुकीत हेतला गाला यांना नऊ हजार मतांपेक्षाही जास्त मतं मिळाली होती. तर शिवसेनेला याठिकाणी केवळ चार हजार मतांवर समाधान मानावं लागलं होतं. काँग्रेसलाही या ठिकाणी फार काही मतं मिळाली नव्हती, काँग्रेसची गाडी या मतदारसंघात चार हजार मतांच्या अलिकडेच अडकली होती. त्यामुळे भाजपने एकहाती हा वॉर्ड जिंकला होता. तर अपक्ष आणि इतर राजकीय पक्ष हे शंभर ते दोनशे मतांवरच अडकले होते. मात्र या मतदारसंघातून लढणाऱ्यांची संख्याही मोठी होती. या मतदारसंघातून तब्बल सतरा उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतांचं विभाजन झालं होतं. यावेळी तेच मतांचं विभाजन टाळण्याचं आव्हान हे शिवसेना आणि महाविकास आघाडीसमोर असणार आहे.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनानिधी प्रमोद शिंदे 4,485 मतं
भाजपरुक्मिणी विठ्ठल खरटमोल3,256 मतं
काँग्रेसउषा अनिल कांबळे 1,333 मतं
राष्ट्रवादीरेशा मधुकर शिससाट1,716 मतं
मनसेशोभा अशोक शानभाग1,009 मतं
अपक्ष/ इतर

कोरोनाकाळात गाला यांचं काम गाजलं.

विद्यमान नगरसेवक हेतल गाला यांचा काम कोरोनाकाळात बरेच गाजले होते. सतत लोकांचा संपर्क आणि कोरोनाबाबत उपाययोजन यामुळे त्यांना यावेळीही त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. या वॉर्डमध्ये जवाहर नगर आणि पटेल नगरपासून अनेक महत्वाच्या परिसरांचा समावेश होतो. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपने आधीपासूनच जाळं पसरायला सुरू केलं आहे. मुंबईतील विविध ठिकाणी पोलखोल यात्र काढून भाजपकडून शिवसेनेवर हल्लाबोल चढवण्यात येत आहे. तर दुसरीकडे राज्य शिवसेनेकडून शिवसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे. त्यामुळे आता यातलं कोणतं अभियान कुणाच्या पत्त्यावर पडणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.