BMC Election 2022 : दौलतनगर वार्डात (10) भाजपाचे वर्चस्व, शिवसेनेला तुटणार का 6 हजाराचा लीड

| Updated on: Jun 09, 2022 | 6:59 PM

2017 च्या निवडणुकीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी भाजपानेही मुंबई महापालिकेत आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. त्यामुळे एकेकाळी पक्के मित्र असले हे पक्ष आता समोरासमोर आले आहेत. शिवाय महापालिकेच्या काही प्रभागामध्ये भाजपाचे उमेदवार अधिक मताच्या फरकाने जिंकले आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपाला थोपवण्यासाठी शिवसेना काही वेगळा फार्म्युला वापरते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

BMC Election 2022 : दौलतनगर वार्डात (10) भाजपाचे वर्चस्व, शिवसेनेला तुटणार का 6 हजाराचा लीड
BMC
Follow us on

मुंबई : मुंबई महापालिकेत (Shivsena) शिवसेना आणि (BJP) भाजप पक्षातच खरी लढत पाहवयास मिळाली होती. एक किंवा दोन नंबरला या पक्षातीलच उमेदवारच राहिलेले आहेत. यंदाच्या निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे बदलली असली तरी स्थानिक पातळीवर शिवसेना-भाजपा मध्येच खरी लढत मानली जात आहे. (Daulatnagar) दौलतनगरातील वार्ड क्र. 10 मध्ये भाजपाचे जितेंद्र आंबादास पटेल यांनी शिवसेनेचे मिलिंद म्हात्रे यांचा 6 हजार 200 मतांनी पराभव केला होता. शिवाय या वार्डातील चित्र स्पष्ट असल्याने यामध्ये केवळ एका अपेक्ष उमेदवाराने नशीब आजमावले होते. मोठ्या फरकाने पटेल यांनी विजय मिळवला असला तरी यंदाच्या निवडणुकीत ते वर्चस्व कायम राखणार का हे पहावे लागणार आहे. मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे.

प्रमुख पक्षांमध्येच रस्सीखेच

वार्ड क्र. 10 मध्ये भाजपाच्या जितेंद्र पटेल यांनी 6 हजारापेक्षा अधिक मताधिक्य घेतले असले तरी या वार्डात प्रमुख पक्षांमध्येच लढत राहिलेली आहे. शिवाय अपक्षांचीही यामध्ये गर्दी नसल्याने पक्षातील उमेदवारांनाच आपले कसब पणाला लावावे लागत आहे. मनसे वगळता कॉंग्रेस, शिवसेना आणि भाजपामध्ये झालेल्या लढतीमध्ये भाजपाने निर्विवाद वर्चस्व निर्माण केले होते. पण गेल्या पाच वर्षात येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत शिवाय राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले असल्याने शिवसेनेच्या उमेदवाराला येथे फायदा होणार का पाहणे महत्वाचे ठरणार आहे.गत निवडणुकीत जितेंद्र पटेल यांचा जनसंपर्क आणि प्रभागातील कामकाजानुसार पक्ष पुन्हा त्यांनाच संधी देणार हे देखील पहावे लागणार आहे.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनानिधी प्रमोद शिंदे 4,485 मतं
भाजपरुक्मिणी विठ्ठल खरटमोल3,256 मतं
काँग्रेसउषा अनिल कांबळे 1,333 मतं
राष्ट्रवादीरेशा मधुकर शिससाट1,716 मतं
मनसेशोभा अशोक शानभाग1,009 मतं
अपक्ष/ इतर

मोठ्या मताधिक्याने भाजपाचे वर्चस्व

2017 च्या निवडणुकीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी भाजपानेही मुंबई महापालिकेत आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. त्यामुळे एकेकाळी पक्के मित्र असले हे पक्ष आता समोरासमोर आले आहेत. शिवाय महापालिकेच्या काही प्रभागामध्ये भाजपाचे उमेदवार अधिक मताच्या फरकाने जिंकले आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपाला थोपवण्यासाठी शिवसेना काही वेगळा फार्म्युला वापरते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दौलतगनगात भाजपाचे जितेंद्र पटेल हे तब्बल 6 हजार 200 मतांनी विजयी झाले होते. त्यामुळे हा लीड तोडणे तसे सहज शक्य नाही. पण यंदा सर्वच राजकीय पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याने काय होऊ शकते हे तर येणारा काळच ठरवेल.

हे सुद्धा वाचा

वार्डातील उमेदवारांना पडलेली मते

> अरुण दशरथ बेळेकर (अपक्ष)- 117
>> संदीप मधुकर मेस्त्री (कॉंग्रेस)- 1745
>> म्हात्रे दिलीप द्वारकानाथ (शिवसेना)- 9362
>> नटे राजेश श्रीधर (मनसे)- 969
>> जितेंद्र आंबादास पटेल (भाजपा)- 15585
>> नोटा – 592