BMC Election 2022 Ward 79 : मुंबईच्या प्रभाग 79मधली लढाई भाजपा-शिवसेनेतच; यावेळी कोण? तगड्या पक्षांना अपक्षांचं आव्हान

| Updated on: Jun 17, 2022 | 7:30 AM

शिवसेनेचे वर्चस्व या वॉर्डात दिसून येते. 23 हजार 515 वैध मतांमध्ये 9659 मते शिवसेनेने मिळवली. तर भाजपाच्या उमेदवाराने 5002 मते प्राप्त केली. युती नसली तरी याठिकाणी भाजपा-सेना यांच्यातच लढत यावेळी पाहायला मिळू शकते.

BMC Election 2022 Ward 79 : मुंबईच्या प्रभाग 79मधली लढाई भाजपा-शिवसेनेतच; यावेळी कोण? तगड्या पक्षांना अपक्षांचं आव्हान
मुंबई महापालिका, वॉर्ड 79
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : बीएमसी अर्थात मुंबई महापालिकेच्या (BMC) निवडणुकीत मुंबईतील एक महत्त्वाचा वॉर्ड म्हणजे प्रभाग क्रमांक 79… गुलमोहर रोड, महाकाली रोड, मालपा डोंगरी रोड यासह इतर महत्त्वाचे विभाग या प्रभागात येतात. 2017च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत याठिकाणी सप्तरंगी लढत झाली होती. भाजपा, शिवसेना, काँग्रेस, मनसे आणि अपक्ष अशा सात पक्षांमध्ये याठिकाणी लढत रंगली होती. यात बाजी शिवसेनेने (Shivsena) मारली होती. मुख्य लढत प्रामुख्याने शिवसेनेसह भाजपा, काँग्रेस आणि एक अपक्ष उमेदवार अजय शिवपूजन तिवारी यांच्यामध्ये झालेली पाहायला मिळाली. भाजपा क्रमांक दोनवर तर अपक्ष उमेदवार क्रमांत तीनवर विजयी झाल्याचे दिसून आले. 39 हजार 427 एकूण मतदार या प्रभागात मागीलवेळी होती. त्यात 23 हजार 515 वैध मते उमेदवारांना मिळाली. आता यावेळी शंकरवाडीच्या (Shankarwadi) मतदारसंघातून कोणाचे वर्चस्व पाहायला मिळेल, हे थोड्याच दिवसांत स्पष्ट होणार आहे.

उमेदवार कोण?

– मोनिका काजमीर फर्नांडिस (मनसे)

– पुरुषोत्तम बाबुराव जळगावरकर (काँग्रेस)

हे सुद्धा वाचा

– संतोष गंगाराम मेढेकर (भाजपा)

– सदानंद वामन परब (शिवसेना)

– संदीप दत्ताराम पवार (अपक्ष)

– अजय शिवपूजन तिवारी (अपक्ष)

– राजेश बुद्धू यादव (सपा)

कोणाला किती मते?

– मोनिका काजमीर फर्नांडिस (मनसे) – 1675

– पुरुषोत्तम बाबुराव जळगावकर (काँग्रेस) – 2046

– संतोष गंगाराम मेढेकर (भाजपा) – 5002

– सदानंद वामन परब (शिवसेना) – 9659

– संदीप दत्ताराम पवार (अपक्ष) – 162

– अजय शिवपूजन तिवारी (अपक्ष) – 4157

– राजेश बुद्धू यादव (सपा) – 493

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेनासदानंद वामन परबसदानंद वामन परब
भाजपासंतोष गंगाराम मेढेकर--
काँग्रेसपुरुषोत्तम बाबुराव जळगावकर --
राष्ट्रवादी----
मनसेमोनिका काजमीर --
अपक्षअजय शिवपूजन तिवारी--

आकडेवारी काय सांगते?

शिवसेनेचे वर्चस्व या वॉर्डात दिसून येते. 23 हजार 515 वैध मतांमध्ये 9659 मते शिवसेनेने मिळवली. तर भाजपाच्या उमेदवाराने 5002 मते प्राप्त केली. युती नसली तरी याठिकाणी भाजपा-सेना यांच्यातच लढत यावेळी पाहायला मिळू शकते.

वॉर्डमधील महत्त्वाचे विभाग?

महाकाली रोड, जिजामाता रोड, मालपा डोंगरी रोड, दत्त जगदंबा मंदिर रोड एमएचबी रोड