BMC Election 2022 Ward 169 : उमेदवार 9, सरशी मात्र शिवसेनेची! वाचा, कुर्ला स्टेशन पूर्व L वॉर्डचा लेखाजोखा

भाजपा, काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी, भारिप बहुजन महासंघ, आणि तीन अपक्ष अशा नऊ पक्षांनी आपले उमेदवार दिले. यात शिवसेनेने (Shivsena) बाजी मारली होती. प्रमुख टक्कर ही भाजपा, शिवसेना यांच्यातच पाहायला मिळाली. भाजपाला पाच हजारांवर तर शिवसेनेला दहा हजारांवर मते मिळाली.

BMC Election 2022 Ward 169 : उमेदवार 9, सरशी मात्र शिवसेनेची! वाचा, कुर्ला स्टेशन पूर्व L वॉर्डचा लेखाजोखा
मुंबई महापालिका, वॉर्ड 169Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 5:58 PM

मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 169 (L Ward 169) यामध्ये 2017ला शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित केले होते. भाजपाने (BJP) शिवसेनेला टक्कर दिली होती. मात्र भाजपाच्या उमेदवाराचा एकतर्फी पराभव शिवसेनेने केला होता. मागील वेळी सर्व पक्ष स्वतंत्र होते. मात्र यावेळी महाविकास आघाडी असल्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी राज्यात सत्तेत आहेत. बीएमसीत आता काय होते, हे पाहावे लागणार आहे. या वॉर्डात मागील वेळी तब्बल नऊ उमेदवार रिंगणात होते. भाजपा, काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी, भारिप बहुजन महासंघ, आणि तीन अपक्ष अशा नऊ पक्षांनी आपले उमेदवार दिले. यात शिवसेनेने (Shivsena) बाजी मारली होती. प्रमुख टक्कर ही भाजपा, शिवसेना यांच्यातच पाहायला मिळाली. भाजपाला पाच हजारांवर तर शिवसेनेला दहा हजारांवर मते मिळाली.

उमेदवार कोण? (2017)

काँग्रेसतर्फे सुभाष आसाराम भालेराव, अपक्ष विजय भाऊराव भवार, भाजपातर्फे श्रीकांत यल्लाप्पा भिसे, राष्ट्रवादीतर्फे प्रमिला प्रताप काकडे, भारिप बहुजन महासंघाकडून मंगेश चंद्रभागा कांबळे, अपक्ष ललिता श्रीरंग खरात-सोनावणे, शिवसेनेकडून प्रवीणा मनिष मोरजकर तर अपक्ष म्हणून गंगा बाबासाहेब वाघमारे हे उमेदवार रिंगणात होते.

कोणाला किती मते?

सुभाष आसाराम भालेराव (काँग्रेस) – 4045

हे सुद्धा वाचा

विजय भाऊराव भवार (अपक्ष) – 132

श्रीकांत यल्लाप्पा भिसे (भाजपा) – 5511

प्रमिला प्रताप काकडे (राष्ट्रवादी) – 461

मंगेश चंद्रभागा कांबळे (भारिप बहुजन महासंघ) – 278

ललिता श्रीरंग खरात-सोनावणे (अपक्ष) – 331

प्रवीणा मनिष मोरजकर (शिवसेना) – 10,299

गंगा बाबासाहेब वाघमारे (अपक्ष) – 150

विजयी उमेदवार
पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनाप्रवीणा मनिष मोरजकर
भाजपश्रीकांत यल्लाप्पा भिसे
राष्ट्रवादी काँग्रेसप्रमिला प्रताप काकडे
काँग्रेससुभाष आसाराम भालेराव
मनसेप्रशांत छबीलाल बगाडे
अपक्ष / इतर

आकडेवारी काय सांगते?

आकडेवारीत सरशी शिवसेनेची पाहायला मिळाली. मुंबईकरांनी नऊ पक्षांमध्ये शिवसेनेला पसंती दिली. तीन अपक्षांनी याठिकाणी नशीब आजमावले. परंतू तिघांची मतांची गोळाबेरीज हजारांपर्यंतही जाऊ शकली नाही. प्रमुख लढत शिवसेना, भाजपा आणि काँग्रेसमध्ये पाहायला मिळाली. नऊ उमेदवारांमुळे मतांची विभागणी झालेली पाहायला मिळाली. एकूण वैध मते ही 23 हजार 617 इतकी होती. सर्वाधिक मते शिवसेना तर सर्वात कमी तीनपैकी एका अपक्षाच्या पारड्यात पडली होती.

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?

नेहरूनगर, कुर्ला स्टेशन (पूर्व), टिळक नगर स्टेशन, कामगार नगर, शिवशक्ती नगर, कुर्ला मदर डेअरी

पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.