BMC Election 2022 Ward 170 : अल्पसंख्याक बहुसंख्याक असलेला मुंबईचा वॉर्ड क्रमांक 170! 2017ला 15 उमेदवार, यावेळी किती?

आकडेवारी पाहिल्यास अल्पसंख्याक समाजाने राष्ट्रवादीला पसंती दिली आहे. 18 हजार 617 एकूण वैध मते पडली आहेत. त्यात 7348 अशी सर्वाधिक मते राष्ट्रवादीच्या उमेदवाराने घेतली होती. तर सर्वात कमी अपक्ष उमेदवाराने 42 इतकी घेतलेली होती.

BMC Election 2022 Ward 170 : अल्पसंख्याक बहुसंख्याक असलेला मुंबईचा वॉर्ड क्रमांक 170! 2017ला 15 उमेदवार, यावेळी किती?
मुंबई महापालिका, वॉर्ड 170Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 5:59 PM

मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) निवडणुकीत मागील वेळी वॉर्ड क्रमांक 170 हा एका वेगळ्या कारणासाठी ओळखला गेला, तो म्हणजे येथील उमेदवार. याठिकाणी तब्बल 15 जण निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 170 (LWard 170) यामध्ये 2017ला राष्ट्रवादीने वर्चस्व प्रस्थापित केले होते. शिवसेना आणि भाजपाने (BJP) राष्ट्रवादीला टक्कर दिली होती. एमआयएमनेही या मतदारसंघात चांगली कामगिरी केली होती. मात्र शिवसेनेसह इतर उमेदवाराचा एकतर्फी पराभव राष्ट्रवादीने केला होता. मागील वेळी सर्व पक्ष स्वतंत्र होते. या वॉर्डात मागील वेळी तब्बल 15 उमेदवार रिंगणात होते. अल्पसंख्याक (Minority) समाजाची संख्या या वॉर्डात अधिक आहे. त्यामुळे विविध पक्षांनी निवडणूक लढवली होती. यात भाजपा, काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी, दोन अपक्ष यांसह समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, एमआयएम, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, भारतीय मायनॉरिटीज सुरक्षा महासंघ, अखिल भारतीय महासंघ, भारिप बहुजन महासंघ अशा पंधरा पक्षांचा समावेश होता.

उमेदवार कोण?

अपक्ष पामेला डेजी पुष्पराज दत्ता, अपक्ष अॅड. आशिष अनिल धुरी, समाजवादी पार्टीकडून इद्रीस मोहम्मद रफिक मोहम्मद रशीद, एमआयएमकडून खान सिराज सोहराब, अपक्ष खान सुबहान, राष्ट्रवादीकडून अब्दुल रशीद कप्तान मलिक, काँग्रेसकडून मनचंदा सतीन मदनमोहन, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीकडून विजय ज्ञानदेव मोरे, भारतीय मायनॉरिटीज सुरक्षा महासंघाकडून कुरेशी अस्लम नूर मोहम्मद, बहुजन समाज पार्टीकडून इफ्तेखार अली मिन्हाज अली सैय्यद अखिल भारतीय सेनेकडून मोहम्मद सलीम अहमद शेख, शिवसेनेतर्फे दर्शना दिलीप शिंदे, मनसेतर्फे महेंद्र विठ्ठल शिंदे, भारिप बहुजन महासंघातर्फे भीमराव ज्ञानदेव शिनगारे तर भाजपाकडून स्वप्निल चंद्रकांत येरूणकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते.

कोणाला किती मते?

पामेला डेजी पुष्पराज दत्ता – 90

हे सुद्धा वाचा

अॅड. आशिष अनिल धुरी – 76

इद्रीस मोहम्मद रफिक मोहम्मद रशीद – 266

खान सिराज सोहराब – 3104

खान सुबहान – 47

अब्दुल रशीद कप्तान मलिक – 7348

मनचंदा सतीन मदनमोहन – 783

विजय ज्ञानदेव मोरे – 128

कुरेशी अस्लम नूर मोहम्मद – 42

इफ्तेखार अली मिन्हाज अली सैय्यद – 115

मोहम्मद सलीम अहमद शेख – 52

दर्शना दिलीप शिंदे – 3214

महेंद्र विठ्ठल शिंदे – 508

भीमराव ज्ञानदेव शिनगारे – 219

स्वप्निल चंद्रकांत येरूणकर – 2502

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
राष्ट्रवादी काँग्रेसअब्दुल रशीद कप्तान मलिक
शिवसेनादर्शना दिलीप शिंदे
भाजपस्वप्निल चंद्रकांत येरूणकर
काँग्रेसमनचंदा सतीन मदनमोहन
मनसेमहेंद्र विठ्ठल शिंदे
अपक्ष / इतर

आकडेवारी काय सांगते?

आकडेवारी पाहिल्यास अल्पसंख्याक समाजाने राष्ट्रवादीला पसंती दिली आहे. 18 हजार 617 एकूण वैध मते पडली आहेत. त्यात 7348 अशी सर्वाधिक मते राष्ट्रवादीच्या उमेदवाराने घेतली होती. तर सर्वात कमी अपक्ष उमेदवाराने 42 इतकी घेतलेली होती. एमआयएमनेही या मतदारसंघात चांगली कामगिरी करत तीन हजारांहून अधिक मते मिळवली.

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?

कुर्ला स्टेशन (पूर्व), कुरेशी नगर, तक्षशीला नगर, राहुल नगर, जेटीबी नगर, कुर्ला (पूर्व) बस डेपो, चुनाभट्टी महापालिका रुग्णालय, मराठी विज्ञान परिषद Kurla Station (East), Qureshi Nagar, Takshshila Nagar, Rahul Nagar, J.T.B.Nagar, Evahrad Nagar, Kurla (East) BEST Depot, Chunabhatti Municipal Hospital, Marathi Vidnyan Parishad

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.