BMC Election 2022 : मुलुंड (108) वार्डात राजकीय पक्षांसह अपक्षांच्या गर्दीत भाजपाचाच बोलबाला, किरीट सोमय्याचा मुलगा राखणार का गड?

मुंबई महानगरपालिकेतील काही वार्डातील निवडणुका ह्या व्यक्तीकेंद्रीत राहणार आहेत. त्यापैकी मुलुंड वार्ड क्र 108 हा असणार आहे. कारण या वार्डातून गतवेळी भाजपाचे नेते किरिट सोमैया यांचा मुलगा निल सोमैय्या यांनी बाजी मारली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाल्यापासून सोमैया आणि शिवसेनेचे खा. संजय राऊत यांच्याचील आरोप- प्रात्यारोपाने मुंबईच नाही तर राज्य दणाणून गेले आहे.

BMC Election 2022 : मुलुंड (108) वार्डात राजकीय पक्षांसह अपक्षांच्या गर्दीत भाजपाचाच बोलबाला, किरीट सोमय्याचा मुलगा राखणार का गड?
मुंबई महापालिका
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 8:29 AM

मुंबई :   मुंबई महानगपालिकेच्या निवडणुकांचे काऊंट डाऊन सुरु झाले आहे. निवडणुकांची तारिख जशी जवळ येत राहील तसे अपक्ष उमेदवारांचे पेव वाढतच असते. या (Mulund  Ward) मुलुंड मधील 108 वार्डाला तर ती परंपराच आहे. या वार्डात अपक्षांची संख्या जरी अधिकची असली तरी मतदारांनी प्रमुख पक्षातील उमेदवारालाच पसंती दिलेली आहे. 2017 बीएमसी निवडणुकांमध्ये या वार्डातून तब्बल 13 (Independent candidate) अपक्ष उमेदवारांनी नशीब आजमावले होते. पण यश मिळाले ते भाजपाच्या (Nil Somaiya) नील किरीट सोमैया यांना. मात्र, गेल्या अडीच वर्षात किरीट सोमैया आणि शिवसेना यांच्यात सुरु असलेली चिखलफेक संबंध राज्याने अनुभवली आहे. या शाब्दिक चकमकीचा परिणाम यंदाच्या निवडणुकीत कसा होणार हे पहावे लागणार आहे. कारण या वार्डात जर नील सोमैया यांना उमेदवारी मिळाली तर सेने आपली प्रतिष्ठा पणाला लावणार यामध्ये शंका नाही. गत निवडणुकीत 4 हजार 70 मतांनी सोमैया यांनी शिवसेनेचे कारिया मुकेश गेलाभाई यांचा पराभव केला होता. गतवेळचा वचपा काढण्यासाठी सेना कोणती समीकरणे आखणार हे पहावे लागणार आहे.

मुलुंडची लढत ठरणार लक्षवेधी

मुंबई महानगरपालिकेतील काही वार्डातील निवडणुका ह्या व्यक्तीकेंद्रीत राहणार आहेत. त्यापैकी मुलुंड वार्ड क्र 108 हा असणार आहे. कारण या वार्डातून गतवेळी भाजपाचे नेते किरिट सोमैया यांचा मुलगा निल सोमैय्या यांनी बाजी मारली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाल्यापासून सोमैया आणि शिवसेनेचे खा. संजय राऊत यांच्याचील आरोप- प्रात्यारोपाने मुंबईच नाही तर राज्य दणाणून गेले आहे. त्यामुळे भाजपचा विशेषत: किरिट सोमैया यांना जर पुन्हा .या वार्डातून उमेदवारी मिळाली तर शिवसेना हा वार्ड प्रतिष्ठेचा करणार यामध्ये शंका नाही.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनानिधी प्रमोद शिंदे 4,485 मतं
भाजपरुक्मिणी विठ्ठल खरटमोल3,256 मतं
काँग्रेसउषा अनिल कांबळे 1,333 मतं
राष्ट्रवादीरेशा मधुकर शिससाट1,716 मतं
मनसेशोभा अशोक शानभाग1,009 मतं
अपक्ष/ इतर

अपक्षांची बाहुगर्दी, मतदारांचे मात्र दुर्लक्ष

मुलुंड या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या वार्डात निवडणुक प्रतिष्ठेची होणार म्हणल्यावर आपसूकच अपक्षांची संख्या ही वाढणारच. कारण 2017 च्या निवडणुकीमध्ये तब्बल 13 अपक्ष या वार्डातून उभारले गेले होते. पैकी सहा जणांना तीन अंकीही मतदान मिळवता आले नाही. शिवाय अपक्षांचा कसलाच प्रभाव क्रमांक 1 किंवा क्रमांक 2 च्या उमेदवारावर झालेला नाही. त्यामुळे अपक्षांची संख्या वाढली तरी त्याचा थेट परिणाम प्रमुख पक्षातील उमेदवारांच्या मतावर होणार नाही ना हे अपक्ष किंगमेकरच्या भूमिकेत राहणार नाहीत.

हे सुद्धा वाचा

असा आहे मतांचा खेळ

>> अमित विश्वनाथ आर्या (अपक्ष)- 152

>> रामकेवल भाष्कर (अपक्ष)-85

>> प्रताप वाशुमल छतवाणा (अपक्ष) 135

>> दिलबाग सिंह (लोक जनशक्ती पार्टी)- 76

>> देशमुख राजेंद्र दत्तात्रय (मनसे)- 3356

>> देशपांडे संजय सावजी(बहुजन समाज पार्टी)-291

>> विजय पंढरी गवई (राष्ट्रवादी कॉंग्रेस)- 806

>> गौतम गेमावत (अपक्ष) 66

>> अरुणा प्रदीप घाडगे (अपक्ष) 196

>> जाधव रामधन मारुती (अपक्ष)- 110

>> कदम मारुती (अपक्ष)-64

>> प्रभाकर ज्ञानोबा कांबळे (अपक्ष)- 72

>> बाबुराव कराईल इट्टी (अपक्ष)- 125

>> कराई मुकेश गेलाभाई (शिवसेना)- 5516

>> राजेंद्र पाटील (अपक्ष)- 385

>> प्रमोद लोकनाथ राजभर (भारिप बहुजन महासंघ)- 207

>> सिंग फौजदार महंगु (अपक्ष)- 114

>> नील किरीट सोमैया (भाजपा)-9586

>> सोनवणे प्रविण शंकर (अपक्ष)- 80

>> विनोद पठाई ठक्कर (अपक्ष)-188

>> बी.के. तिवारी (राष्ट्रवादी कॉंग्रेस) 5013

> नोटा – 648

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.