BMC Election 2022- Hanuman Tekadi , R A colony( Ward 53) – खुल्या जागेसाठी आरक्षित झालेल्या ‘या’ वार्डात बाजी कोण मारणार? रेखा रामवंशी आपले अस्तित्व टिकवणार का?

| Updated on: Jul 05, 2022 | 9:00 AM

यावेळी प्रभाग 53  हा खुला असल्याने थेट लढत होताना  दिसून येणार आहे. त्यामुळे रेखा रामवंशी यावेळीही बाजी मारणार की खुला प्रभागामुळे आजी -माजी उमेदवारांना आपली जागा निश्चित करण्यासाठी ही प्रयत्न करावे लागणार ?

BMC Election 2022- Hanuman Tekadi , R A colony( Ward 53) - खुल्या जागेसाठी आरक्षित झालेल्या या वार्डात बाजी कोण मारणार? रेखा रामवंशी आपले अस्तित्व टिकवणार का?
Follow us on

मुंबई- राज्यातील14 महापालिकांचे बिगूल वाजले आहे. यामध्ये बृहन्मुंबई महानगर पालिकेचाही(BMC Election ) समावेश आहे. यावेळच्या महापालिका निवडणुकीत नेमक कोण बाजी मारणार , विजयाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दक्षिण मुंबईमधला प्रभाग क्रमांक 53 हनुमान टेकडी  (Hanuman Tekadi)शिवसेनेचा बालेकिल्ला मनाला जातो. हा वार्ड हनुमान टेकडी म्हणून प्रसिद्ध आहे. 2017  च्या निवडणुकीत शिवसनेच्या(Shivasena) उमेदवार रेखाताई दादासाहेब रामवंशी यांनी सर्वाधिक 6088 मते घेऊन बाजी मारली होती. अनुसूचित जातीसाठी राखीव आलेल्या या प्रभागातून रेखाताई यांनी भारतीय जनता पार्टीच्या संगीता शिंदे या उमेदवाराला दुप्पट मताने पिछाडीवर टाकत विजयाची माळ आपल्या गळ्यात घातली होती. यावेळी कोरोना महामारीनंतर होऊ घातलेलया 2022 च्या निवडणुकीत नेमका कुणाला विजय मिळणार हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे. 2017  च्या निवडणुकीत शिवसेना , भाजपबरोबरच काँग्रेसच्या रोहिणी संकपाळ, मनसेकडून पूनम खरात, आरपीआयकडून यांना ऍड स्वाती यादव यांना उमेदवारी देण्यात आली होती.

मागच्या निवडणुकीत काय घडलं?

2017 च्या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी(महिला) वार्ड राखीव होता. या निवडणुकीत शिवसेना भाजप, काँग्रेस , मनसेसह आरपीआय असे सर्वच पक्ष स्वबळावर ही निवडणूक लढले होते.अत्यंत अटी-तटीच्या झालेल्या निवडनुकीत रेखाताई दादासाहेब रामवंशी यांनी विजय मिळवला होता.  त्यांना तब्बल 6088 मते मिळाली होती. मात्र यावेळी प्रभाग 53  हा खुला असल्याने थेट लढत होताना  दिसून येणार आहे. त्यामुळे रेखा रामवंशी यावेळीही बाजी मारणार की खुला प्रभागामुळे आजी -माजी उमेदवारांना आपली जागा निश्चित करण्यासाठी ही प्रयत्न करावे लागणार?

हे सुद्धा वाचा

2017  च्या निवडणुकीचा निकाल काय सांगतो

दर्शना प्रकाश खंडागळे – अपक्ष – 1822

पूनम बबन खरात – मनसे -890 ,

अलका महादेव लांडगे, भारिप बहुजन महासंघ – 990 ,

रेखाताई दादासाहेब रामवंशी – शिवसेना – 6088 ,

पूजा अर्जुन सदाफुले -अपक्ष -105

रोहिणी संदीप संकपाळ – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – 2358 ,

संगीत विठ्ठल शिंदे- भारतीय जनता पार्टी – 3555,

ऍड स्वाती साधू यादव – आरपीआय- 213

वार्ड कुठून कुठपर्यंत

या वार्डामध्ये हनुमान टेकडी, विरवानी इंडस्ट्रीयल इस्टेट, जयप्रकाश नगर पहाडी स्कूल, आरे कॉलनी हे परिसर येतात.

मतदार संघाची लोकसंख्या किती?

या मतदारसंघाची एकूण लोकसंख्या 27 हजार703  एवढी आहे.यामध्ये अनुसूचितजातीची लोकसंख्या 1019 आहे. तर अनुसूचित जमातींची लोकसंख्या 425 एवढी आहे.