BMC Election 2022: Aarey Colony- Ward 53 – आरे कॉलनीतील सर्वसाधारण महिला आरक्षित मतदार संघात बाजी कोण मारणार
या निवणुकीत हा मतदार संघ सर्वसाधारण महिला आरक्षित झाल्याने यामध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. गेल्या निवडणुकीतील महिलांना यावेळी आपले स्थान टिकवून ठेवण्यात यश येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे .
मुंबई- मुंबई महानगरपालिकेचे निवडणुकीचे बिल वाजले आहे आरक्षणाची सोडत झाली असून वार्ड क्रमांक 53 आरे कॉलनी(Aarey Colony) म्हणून ओळखला जातो. 2017 च्या निवडणुकीत अनुसूचित जातीच्या स्त्रियांसाठी हा मतदारसंघ राखीव होता. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना,भारिप बहुजन महासंघ, शिवसेना काँग्रेस, बीजेपी ,आरपीआय या पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते. यामध्ये शिवसेनेच्या (Shivsena)रेखाताई रामवंशी यांनी बाजी मारत ही निवडणूक जिंकली होती. त्यांना या निवडणुकीत 6088 मते मिळाली होती. यंदा 2022 च्या निवडणुकीत नेमका कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या निवणुकीत हा मतदार संघ सर्वसाधारण महिला आरक्षित (Ordinary women reserved)झाल्याने यामध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. गेल्या निवडणुकीतील महिलांना यावेळी आपले स्थान टिकवून ठेवण्यात यश येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे .2017 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांसह मनसे आणि अन्य पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी सर्व राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढली होती. मात्र यावेळी राज्यात बदललेल्या सत्तासमीकरणचा फायदा भाजप व शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला होणार का? की बंडखोर आमदारांमुळे शिवसेनेला भावनिकतेवर विजय ठरणार याकडे लक्ष आहे. राज्यात घडलेल्या राजकीय सत्तांतराचा परिणाम निश्चित निवडणुकीवर होणार आहे. शिवसेनेचे दोन गटातील विभाजनशिवसेनेच्या मत पेटीवर होतानादिसणार आहे. या निवडणुकीत मनसे कसे उतरणार हे पाहणे ही महत्त्वाचेआहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष / इतर |
2017 चा निकाल काय सांगतो
दर्शना प्रकाश खंडागळे -अपक्ष- 1822 पुनम बबन खरात -महाराष्ट्र नवनिर्माण सेना -890 अलका भरत लांडगे-भरीत बहुजन महासंघ -990 रेखाताई दादासाहेब रामवंशी – शिवसेना -6088 पूजा अर्जुन सदाफुले -अपक्ष -105 रोहिणी संदीप सपकाळ -भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -2358 संगीता विठ्ठल शिंदे -भारतीय जनता पार्टी -355 स्वाती साधू यादव- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- 213
मतदारांची संख्या किती
या निवडणुकीत एकूण 16,021 मतदारांनी मतदान केले होते. या मतदारसंघाचे एकूण लोकसंख्या 47 हजार 39 असून यामध्ये अनुसूचित जातीचे 5413 व अनुसूचित जमातीचे 2701 एवढे मतदार आहेत.
वार्ड कुठून कुठपर्यंत
आरे कॉलनी, फिल्म सिटी, रॉयल पल, युनिट नंबर 22, आरे डेरी, महानंदा डेअरी, एस आर पी एफ या परिसरांचा समावेश होतो.