BMC Election 2022 Ward 111 Mulund : अटीतटीच्या लढतीचा वॉर्ड क्रमांक 111; भाजपासह राष्ट्रवादी आणि शिवसेनेत असणार टक्कर

आकडेवारीवर नजर टाकल्यास सर्वाधिक मते मिळवणाऱ्या भाजपाच्या सारिका पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या भारती पिसाळ या दोन क्रमांकावर होत्या. तर शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर दिसून आली. या तिनही उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये फारसा फरक नाही. त्यामुळे यावेळी कोण जिंकणार, याची उत्सुकता आहे.

BMC Election 2022 Ward 111 Mulund : अटीतटीच्या लढतीचा वॉर्ड क्रमांक 111; भाजपासह राष्ट्रवादी आणि शिवसेनेत असणार टक्कर
मुंबई महापालिका वॉर्ड 111Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 7:30 AM

मुंबई : मुंबई महापालिकेची (BMC) मुदत संपल्यानंतर आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मागील वेळी मुंबई महापालिकेत प्रमुख चार पक्ष स्वतंत्र लढले होते. यावेळी महाविकास आघाडी सरकार असल्याने ते एकत्र लढणार की स्वतंत्र हे पाहावे लागणार आहे. मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 111मध्ये (Ward 111) 2017ला तब्बल सात उमेदवार उभे राहिले होते. भाजपा, भारिप बहुजन महासंघ, बहुजन समाज पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी यासह शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांनी आपले उमेदवार दिले. यात भाजपाने (Bharatiya Janata Party) बाजी मारली होती. उमेदवारांना मिळालेली मते याच्यामध्ये फारसे अंतर नव्हते. त्यामुळे थोड्या फरकाने इतर विशेषत: भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना पडलेल्या मतांमध्ये खूपच कमी अंतर होते. त्यामुळे यावेळी कोणाच्या पारड्यात मुंबईकर मत टाकतात, याची उत्सुकता आहे.

उमेदवार कोण?

वॉर्ड क्रमांक 111मध्ये तब्बल सात पक्षांनी आपले उमेदवार उभे केले होते. महिलांसाठी हा वॉर्ड राखीव होता. यात मनसेतर्फे मनिषा मनोज चव्हाण, भारिप बहुजन महासंघाकडून वैशाली प्रशांत गंगावणे, बहुजन समाज पार्टीकडून शीतल मनोहर निकम, काँग्रेसकडून कांता शालीराम पटेकर, भाजपाकडून सारिका मंगेश पवार, राष्ट्रवादीतर्फे भारती धनंजय पिसाळ तर शिवसेनेकडून संजीवनी विश्वास तुपे अशा महिला उमेदवार यांच्याच लढत होती.

कोणाला किती मते?

– मनिषा मनोज चव्हाण – 2954

हे सुद्धा वाचा

– वैशाली प्रशांत गंगावणे – 303

– शीतल मनोहर निकम – 897

– कांता शालीराम पटेकर – 959

– सारिका मंगेश पवार – 7646

– भारती धनंजय पिसाळ – 6577

– संजीवनी विश्वास तुपे -6443

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनानिधी प्रमोद शिंदे 4,485 मतं
भाजपरुक्मिणी विठ्ठल खरटमोल3,256 मतं
काँग्रेसउषा अनिल कांबळे 1,333 मतं
राष्ट्रवादीरेशा मधुकर शिससाट1,716 मतं
मनसेशोभा अशोक शानभाग1,009 मतं
अपक्ष/ इतर

आकडेवारी काय सांगते?

आकडेवारीवर नजर टाकल्यास सर्वाधिक मते मिळवणाऱ्या भाजपाच्या सारिका पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या भारती पिसाळ या दोन क्रमांकावर होत्या. तर शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर दिसून आली. या तिनही उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये फारसा फरक नाही. त्यामुळे यावेळी कोण जिंकणार, याची उत्सुकता आहे.

वॉर्ड खुला की आरक्षित?

मुंबई महापालिकेतील वॉर्ड क्रमांक 111 हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?

या वॉर्डमध्ये हनुमान पाडा, मुलुंड, किर्ती नगर, भवानी नगर, टाटा नगर, श्याम नगर, दातार कॉलनी, साई नगर, रुक्मिणी नगर यांचा समावेश होतो.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.