BMC Election 2022 Rathodi, Malad (Ward 35): भाजप पुन्हा आपला गड राखणार?
2017 च्या महापालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक 35 मधून एकूण सात उमेदवार उभे होते. या वार्डामध्ये मनसेने आपला उमेदवार उभा केला नव्हता. या वार्डात सर्वाधिक मते भाजपाला पडले.
मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीचे (Mumbai Municipal Election) बिगूल वाजले आहे. सर्वांच्या नजरा या महापालिकेच्या निवडणुकीकडे लागल्या आहेत. गेली अनेक वर्ष मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) ही शिवसेनेच्या (ShivSena) ताब्यात आहे. मात्र यंदा भाजपाने देखील विजयासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक ही अटतटीची होण्याची शक्याता आहे. वार्ड क्रमांक 35 मध्ये गेल्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली होती. या वार्डामधून भाजपाच्या सेजल देसाई या 2017 मध्ये विजयी झाल्या होत्या. विशेष म्हणजे या वार्डामधून मनसेने आपला उमेदवार दिला नव्हता. वार्ड क्रमांक 35 मध्ये राठोडी गाव, खारोडी, बाफीरा नगर आणि न्यू महाकाली नगर या प्रमुख भागांचा समावेश होतो. वार्ड क्रमांक 35 मध्ये गेल्या निवडणुकीत सर्वाधिक मते ही भाजपाच्या उमेदवार सेजल देसाई यांना पडली. या वार्डामधून सेजल देसाई यांनी तब्बल 13751 मते घेतली. तर दुसऱ्या क्रमांकावर 5778 मतांसह काँग्रेस राहिले. तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना होती.
एक नजर आकडेवारीवर
2017 च्या महापालिका निवडणुकीत या वार्डमधून एकूण सात उमेदवार उभे होते. या वार्डामध्ये मनसेने आपला उमेदवार उभा केला नव्हता. या वार्डात सर्वाधिक मते भाजपाला पडले. पाहुयात कोणाला किती मते पडली.
उमेदवार मते
सेजल प्रशांत देसाई ( भाजप ) 13751
हींगु श्वेता शैलेश ( एनसीपी) 150
प्रभलीन बील्लाजी ( शिवसेना ) 5624
पारुल महेता (काँग्रेस) 5778
सुपडाबाई जंजाळे (अपक्ष ) 55
त्रिजा नाडार (अपक्ष) 344
रुपा हितेन शहा (अपक्ष) 107
पक्ष | उमेदवार (Candidate) | विजयी/आघाडी (Win/Lead) |
---|---|---|
शिवसेना | निधी प्रमोद शिंदे | 4,485 मतं |
भाजप | रुक्मिणी विठ्ठल खरटमोल | 3,256 मतं |
काँग्रेस | उषा अनिल कांबळे | 1,333 मतं |
राष्ट्रवादी | रेशा मधुकर शिससाट | 1,716 मतं |
मनसे | शोभा अशोक शानभाग | 1,009 मतं |
अपक्ष/ इतर |
एकूण मतदारांची संख्या
या वार्डामध्ये एकूण मतदारांची संख्या 45428 एवढी आहे. त्यापैकी 2017 च्या महापालिका निवडणुकीत एकूण 25809 एवढे मतदान झाले. नोटाला झालेल्या मतदानाची संख्या या वार्डात जास्त असल्याचे दिसून येते. या वार्डात एकूण 473 मतदान हे नोटाला झाले. भाजपाला या वार्डात जवळपास पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाल्याचे आकडेवारीवरून समोर येते. या वार्डात भाजपाच्या जवळपास एकही पक्ष पोहोचू शकला नाही.
वॉर्ड कुठून कुठपर्यंत?
वॉर्ड क्रमांक 35 मध्ये राठोडी गाव, खारोडी, बाफीरा नगर, न्यू महाकाली नगर या प्रमुख भागांचा समावेश होतो.