BMC Election 2022 ward 177 Hindu Colony : हिंदू कॉलनीतून नेहल शहा भाजपचा गड राखणार का? काय असेल वॉर्ड क्रमांक 177 चे गणित?

| Updated on: Jun 09, 2022 | 10:11 PM

एकंदरित 20 हजारांपैकी 11 हजारांवर मत एकट्या भाजपच्या उमेदवारानं घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक हजारांचा टप्पाही पार पाडता आला नाही. सर्व उमेदवारांना विजयी उमेदवाराएवढीही मतं घेवू शकले नाहीत. वॉर्ड 199 मध्ये भाजपचाच बोलबाला होता. एकेरी विजय नेहल शहा यांनी खेचून आणला.

BMC Election 2022 ward 177 Hindu Colony : हिंदू कॉलनीतून नेहल शहा भाजपचा गड राखणार का? काय असेल वॉर्ड क्रमांक 177 चे गणित?
हिंदू कॉलनीतून नेहल शहा भाजपचा गड राखणार का?
Image Credit source: t v 9
Follow us on

मुंबई : मुंबई देशाची आर्थिक राजधानी. त्यामुळं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडं सर्वांचे डोळे लागले आहेत. 2017 च्या निवडणुकीत वॉर्ड 177 मधून भाजपच्या नेहल शाह (Nehal Shah) या निवडून आल्यात. त्यावेळी मिळालेले मताधिक्य पाहता याही वेळी नेहल शाह यांना उमेदवारी मिळण्याची जास्त शक्यता आहे. कारण या वॉर्डातून महिला (Women) सर्वसाधारण गटासाठी आरक्षण जाहीर झालंय. मुंबई महापालिकेच्या 236 वॉर्डाचे आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या वॉर्डाच्या आरक्षणानंतर (Reservation) पंजाबी कॅम्प, काणे नगर (नॉर्थ), शंमुखानंद हॉल, फाईव्ह गार्डन, हिंदू कॉलनी या भागाचा वॉर्ड 177 मध्ये समावेश होतो.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनामहालक्ष्मी गणात्रा
भाजपनेहल शाह
राष्ट्रवादी काँग्रेसप्रिन्सी कौर
काँग्रेसजसबीरसिंग बिरा
मनसेअनामिका विवेक बोरकर
अपक्ष / इतर

असे होते लोकसंख्येचे प्रमाण

2011 च्या लोकसंख्येनुसार, वॉर्ड क्रमांक 177 ची लोकसंख्या ही 52 हजार 731 होती. त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या ही 3 हजार 53, तर अनुसूचित जमीतीची लोकसंख्या 201 होती. वॉर्ड 177 मध्ये एकूण 11 उमेदवार 2017 च्या निवडणुकीत रिंगणार होते. एकूण मतदार 36 हजार 554 होते. त्यापैकी 20 हजार 148 जणांनी मतदान केले. नेहल शाह या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार या निवडणुकीत जिंकल्या.

2017 मध्ये निवडणुकीत उभे असलेले महत्वाचे उमेदवार

महालक्ष्मी गणात्रा (शिवसेना) 2633
प्रिन्सी कौर जसबीरसिंग बिरा (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – 3158
नेहल शाह (भारतीय जनता पक्ष) – 11298
अनामिका विवेक बोरकर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) 630
हरविंदर कौर सैगल (अपक्ष) 868

हे सुद्धा वाचा

2017 भाजपच्या नेहल शहा यांचा एकेरी विजय

एकंदरित 20 हजारांपैकी 11 हजारांवर मत एकट्या भाजपच्या उमेदवारानं घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक हजारांचा टप्पाही पार पाडता आला नाही. सर्व उमेदवारांना विजयी उमेदवाराएवढीही मतं घेवू शकले नाहीत. वॉर्ड 199 मध्ये भाजपचाच बोलबाला होता. एकेरी विजय नेहल शहा यांनी खेचून आणला.
नोटाला 489 मतं मिळाली होती.

यावेळी आरक्षण कुणाचे

सर्वसाधारण महिला आरक्षण

वॉर्ड 177 मध्ये या वॉर्डांचा समावेश

या वॉर्डाच्या आरक्षणानंतर (Reservation) पंजाबी कॅम्प, काणे नगर (नॉर्थ), शंमुखानंद हॉल, फाईव्ह गार्डन, हिंदू कॉलनी या भागाचा वॉर्ड 177 मध्ये समावेश होतो.