BMC Election 2022 Shivaji Park, Matunga Road West (Ward 191) गेल्यावेळी शिवसेनेचा निसटता विजय, यंदा कोण बाजी मारणार?
या वार्डामध्ये सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी सिंधी कॉलनी, शिवाजी पार्क, माटुंगा रोड (पश्चिम) या प्रमुख भागांचा समावेश होतो. या वार्डातून गेल्यावेळी शिवसेनेच्या उमेदवार विशाखा राऊत या विजयी झाल्या होत्या.
मुंबई : वार्ड क्रमांक 191 मध्ये सिद्धिविनायक मंदिर (Siddhivinayak Temple), महालक्ष्मी सिंधी कॉलनी, शिवाजी पार्क, माटुंगा रोड (पश्चिम) या प्रमुख भागांचा समावेश होतो. या वार्डातून 2017 च्या महापालिका निवडणुकीत (Municipal elections) शिवसेनेच्या (shivsena) उमेदवार विशाखा राऊत यांनी विजय मिळवला होता. त्यांना एकूण 10660 मते मिळाली. त्यांनी मनसेच्या उमेदवार स्वप्ना देशपांडे यांचा पराभव केला. स्वप्ना देशपांडे यांना एकूण 8 हजार 297 मते पडली. आकडेवारीवर नजर टाकल्यास विशाखा राऊत आणि स्वप्ना देशपांडे यांच्यामधील मतांचे अंतर फार नाही. या वार्डामधून राऊत यांनी निसटताच विजय मिळवला असे म्हणावे लागेल. या वार्डात पंचरंगी लढत पहायला मिळाली. शिवसेना, भाजप, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा सर्वच प्रमुख पक्षांनी या वार्डामधून आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते.
एक नजर आकड्यांवर
वार्ड क्रमांक 191 मध्ये गेल्या महापालिका निवडणुकीत पंचरंगी लढत पहायला मिळाली. भाजप, मनसे, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते. या वार्डामधून शिवसेनेच्या उमदेवार विशाखा राऊत यांनी विजय मिळवला. त्यांना 10660 मते मिळाली. तर मनसेच्या उमदेवार स्वप्ना देशपांडे या दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या त्यांना एकूण 8 हजार 297 मते पडली. काँग्रेसच्या उमेदवार रोशना शाह यांना 1466 मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार वंदना दळवी यांना अवघ्या 173 मतांवर समाधान मानावे लागले.
एकूण झालेले मतदान
गेल्या महापालिका निवडणुकीत या वार्डामधून एकूण 29 हजार 494 मतदान झाले. त्यापैकी सर्वाधिक मतदान हे शिवसेनेच्या उमेदवार विशाखा राऊत यांना मिळाले. विशाखा राऊत यांनी या वार्डामधून 10660 मते मिळवत बाजी मारली. तर या वार्डामधून एकूण 611 मते ही नोटाला पडली.
महापालिका निवडणूक निकाल 2017 पक्षनिहाय (bmc election result 2017 winner
पक्ष | उमेदवार (Candidate) | विजयी/आघाडी (Win/Lead) |
---|---|---|
शिवसेना | विशाखा राऊत | विशाखा राऊत |
भाजप | डॉ. तेजस्वी जाधव | |
राष्ट्रवादी काँग्रेस | वंदना दळवी | |
काँग्रेस | रोशना शाह | |
मनसे | स्वप्ना देशपांडे | |
अपक्ष / इतर |
वॉर्ड कुठून कुठपर्यंत?
या वार्डामध्ये सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी सिंधी कॉलनी, शिवाजी पार्क, माटुंगा रोड (पश्चिम) या प्रमुख भागांचा समावेश होतो.
शिवसेना वार्ड राखणार?
गेल्या निवडणुकीवर नजर टाकल्यास असे दिसून येते की, शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारामध्ये मतांचे फारसे अंतर नाही. या वार्डामधून शिवसेनेच्या उमेदवार विशाखा राऊत यांचा निसटता विजय झाला आहे. त्यामुळे या वार्डात मनसेने आणखी थोडा जोर लावल्यास हा वार्ड पुन्हा एकदा राखणे शिवसेनेसाठी कठिण होऊ शकते.