पुणे, नाशिकनंतर आता राज ठाकरेंनी मुंबईकडे मोर्चा वळवला, भांडुपमध्ये मनसेचा मेळावा होणार

23 ऑक्टोबरला मुंबईतील भांडुपमध्ये मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला पक्षप्रमुख राज ठाकरे संबोधित करणार आहेत. आगामी महापालिका निवडणूक पक्षबांधणी, राजकीय रणनीती याबाबत राज ठाकरे मार्गदर्शन करतील अशी माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिलीय.

पुणे, नाशिकनंतर आता राज ठाकरेंनी मुंबईकडे मोर्चा वळवला, भांडुपमध्ये मनसेचा मेळावा होणार
राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
Follow us
| Updated on: Oct 17, 2021 | 2:14 PM

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्य पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे कामाला लागल्याचं पाहायला मिळतं आहे. मनसेचा बालेकिल्ला राहिलेल्या नाशिकमध्ये राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी दौऱ्यांची मालिकाच सुरु केली आहे. त्या पाठोपाठ राज ठाकरे यांचा पुणे दौरा सुरुच आहे. या दौऱ्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठका, संघनात्मक बदल, स्थानिक समस्यांवर चर्चा आदी मुद्द्यांवर राज ठाकरे भर देत असल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी राज ठाकरे यांनी आता आपला मोर्चा मुंबईकडे वळवला आहे. 23 ऑक्टोबर रोजी भांडुपमध्ये राज ठाकरे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. (Meeting of MNS office bearers will be held in Bhandup in the presence of Raj Thackeray)

मागील निवडणुकीत मनसेला राज्यात चांगलं यश प्राप्त करता आलेलं नाही. मात्र, आगामी निवडणुकीसाठी मनसेने कंबर कसली आहे. विशेष म्हणजे नाशिक, पुणे, ठाणे मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद या ठिकाणी मनसेकडून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. राज ठाकरे स्वत: या महापालिकांकडे बारकाईने लक्ष देत आहेत. गेल्या महिनाभरात नाशिक, पुण्यातील संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यात आल्यानंतर राज ठाकरे यांनी आता मुंबईकडे मोर्चा वळवला आहे. 23 ऑक्टोबरला मुंबईतील भांडुपमध्ये मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला पक्षप्रमुख राज ठाकरे संबोधित करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षबांधणी, राजकीय रणनीती याबाबत राज ठाकरे मार्गदर्शन करतील, अशी माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिलीय.

मुंबई महापालिकेसाठी मनसेनं कंबर कसली!

मुंबई महापालिकेत मागील निवडणुकीत मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले होते. यातील 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेचा फक्त एक नगरसेवक आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेसाठी मनसेनं सहा महिन्यांपूर्वीपासूनच कंबर कसली आहे. सर्व नेत्यांना विभागवार जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात अमित ठाकरे यांचाही समावेश आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीत मनसे मुंबईत एकूण 40 वॉर्डात दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यामुळे मनसेकडून आता अधिक जोर लावला जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

मनसे हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरपणे पुढे घेऊन जाणार?

मनसेनं नवीन झेंडा आणि नवीन अजेंडा स्वीकारल्यानंतर हिंदुत्वाची कास धरलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसेकडून हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरपणे लावून धरला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी पालिका निवडणुकीतही मनसे हाच मुद्दा लावून धरण्याची शक्यता आहे. हिंदुराष्ट्राच्या मजबूत बांधणीसाठी गुरु मा कांचन गिरीजी उद्याराज ठाकरे यांची मुंबईत भेट घेणार आहेत. त्यामुळे मनसे हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरपणे पुढे घेऊन जात आहे का, हा प्रश्न उपस्थित होतोय. भाजपशी जुळवून घेण्यासाठी मनसेकडून हा आटापिटा केला जात असल्याचंही बोललं जात आहे.

इतर बातम्या :

दादरा नगर हवेलीत शिवसेनेचा आवाज घुमणार? डेलकरांच्या प्रचारासाठी ठाकरे भाजपच्या गडात शड्डू ठोकण्याच्या तयारीत

पवारांचा भाजप नेत्याकडून एकेरी उल्लेख, राऊत म्हणतात, यांच्या डोक्याची चौकशी करा!

Meeting of MNS office bearers will be held in Bhandup in the presence of Raj Thackeray

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.