मुंबई : देशातील सर्वाधिक श्रीमंत महापालिका अशी मुंबई महापालिकेची ओळख आहे. यंदा याच श्रीमंत महापालिकेची निवडणूक (Election) होत आहे. या निवडणुकीत आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी प्रमुख पक्ष जोरदार तयारीने रिंगणात उतरत आहेत. ही निवडणूकही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून गाजण्याची शक्यता आहे. हिंदुत्वाचा (Hindusm) मुद्दा निवडणुकीत केंद्रस्थानी राहू शकतो. त्याच अनुषंगाने प्रमुख पक्षांकडून उमेदवारांची निश्चिती केली जात आहे. निवडणूक कार्यक्रमांतर्गत नुकतीच आरक्षण सोडत जाहीर झाली. त्यात काही दिग्गज नेत्यांना अपेक्षित आरक्षण न पडल्याने त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. ते उमेदवार सुरक्षित मतदारसंघांचा शोध घेत आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर यंदाची महापालिका निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. वॉर्ड क्रमांक 17 ची निवडणूक देखील चुरशीची होणार आहे. या वॉर्डात भाजपला सुषम गोपाळ सावंत (Susham Gopal Sawant) यांनी केलेली विकासकामे विजयश्री खेचून आणण्यास मदत करताहेत कि शिवसेना किंवा काँग्रेस आणखी जोर लावून गेल्या निवडणुकीतील विजयाचे स्वप्न पूर्ण करताहेत, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
उत्तरेकडे चंदावरकर रोड आणि एक्सर रोड या जंक्शनपासून एक्सर रोडच्या पश्चिमबाजूने दक्षिणेकडे बाभाई रोडपर्यंत आणि तिथून बाभाई रोडच्या पश्चिमबाजूने दक्षिणबाजूने टी पी एस रोड नं 56 पर्यंत विस्तार आहे. तेथून टी पी एस रोड नं 56 च्या उत्तरबाजूने पश्चिमेकडे दक्षिणेकडे हरिदास नगर रोडपर्यंत असा या प्रभागाचा विस्तार आहे.
पक्ष | उमेदवाराचे नाव | विजयी |
---|---|---|
भाजप | बीना परेश दोशी | 14414 |
शिवसेना | शिल्पा सांगोरे | 4822 |
काँग्रेस | प्रगती राणे | 4310 |
अपक्ष | मीरा कामथ | 336 |
पक्ष | उमेदवाराचे नाव | विजयी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी |