फडणवीस साहेब, तुमच्या धमक्यांचे व्हिडीओ बाहेर काढायला लावू नका, धनंजय मुंडे मैदानात

'विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कशा धमक्या दिल्या, याच्या व्हिडीओ क्लिप आहेत. त्या बाहेर काढायला लावू नका', असा इशाराच धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

फडणवीस साहेब, तुमच्या धमक्यांचे व्हिडीओ बाहेर काढायला लावू नका, धनंजय मुंडे मैदानात
Follow us
| Updated on: Nov 28, 2020 | 1:38 PM

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सरकारच्या कामाची पोलखोल केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत, ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत धमकीची भाषा वापरल्याचा आरोप करत, धमकी देणारा मुख्यमंत्री आपण पाहिला नसल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. फडणवीसांच्या या टीकेला आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.(Dhananjay Munde criticize Devendra fadnavis)

‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कशा धमक्या दिल्या, याच्या व्हिडीओ क्लिप आहेत. त्या बाहेर काढायला लावू नका’, असा इशाराच धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. ‘उद्धव ठाकरे हे ज्या संस्कारात लहानाचे मोठे झाले. त्यात त्यांना धमकावणं कधी जमलं नाही. एखादी व्यक्ती बदनाम होत नसेल तर त्या व्यक्तीला विविध पद्धतीनं बदनाम करण्याची भाजपची जुनी पद्धत आहे’, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी फडणवीसांवर टीकास्त्र डागलं आहे.

‘केंद्र आणि कोरोनामुळे विकासाची गती मंदावली’

राज्यातील महाविकास आघाडीला झालेल्या वर्षपूर्तीनिमित्त धनंजय मुंडे यांनी सरकारमधील सर्वांना शुभेच्छा दिल्या. महाविकास आघाडी सरकारच्या 1 वर्षाच्या कार्यकाळात कोरोनाचं मोठं संकट आलं. या संकटात जनतेच्या आरोग्याचा सांभाळ करत आणि विकासाची सांगड घातली. 2 लाखापर्यंत कर्जमाफीचा निर्णय, नियमित कर्ज फेडणाऱ्या कर्जदारांना 50 हजार रुपये, असे अनेक महत्वाचे निर्णय सरकारनं घेतल्याचं मुंडे यांनी आवर्जुन सांगितलं. केंद्राकडे राहिलेले GSTचे पैसे न मिळाल्यानं आर्थिक निर्बंध लादले. हे आर्थिक निर्बंध आणि कोरोनामुळे विकासाची गती मंदावल्याची खंतही मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली.

धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही- फडणवीस

“महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं. मात्र अचिव्हमेंट काय आहे? मुख्यमंत्र्यांनी सामनाला मुलाखत दिली, पण त्यामध्ये वर्षपूर्तीचा आढावा हवा होता, प्रश्न कसे सोडवणार, याबद्दलचं व्हिजन आवश्यक होतं, मात्र ते दिसलंच नाही. मुलाखतीत फक्त धमक्या दिसल्या. मुख्यमंत्री संयमी आहेत हे ऐकून होतो पण दसरा मेळाव्याचं भाषण असो की कालची मुलाखत यातून ते संयमी नसल्याचं दिसून आलं”, अशी टीका फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केली.

“हात धुवून मागे लागू, खिचडी शिजवू, ही कोणती भाषा? तुम्ही संविधानिक पदावर आहे. अशा प्रकारची भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. या मुलाखतीत विकासावर अजिबात चर्चा नाही. चर्चा कशावर तर कुणाच्या मागे हात धुवून लागू आणि कुणाची खिचडी शिजवू यावर मुलाखतीचा भर होता. ही मुलाखत मुख्यमंत्रिपदाला शोभणारी नव्हती”, असं फडणवीस म्हणाले.

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्र्यांची मुलाखत एक दिवस आधी आली हे बरं झालं, नाहीतर तो न्यायालयाचा अवमान ठरला असता : फडणवीस

ठाकरे सरकार राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी लायक, पण आमची तशी मागणी नाही : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnvis | तिन्ही पक्षाचं सरकार पक्षवाढीसाठी कसं वापरायचं हे पवारांना चांगलंच माहिती : देवेंद्र फडणवीस

NCP leader Dhananjay Munde criticize Devendra fadnavis

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.