भाजप आणि RSS ची बैठक, 2024 च्या निवडणुकीचा मेगा प्लॅन ठरला; जितेंद्र आव्हाड यांचा मोठा दावा

NCP Leader Jitendra Awhad Tweet About Maharashtra BJP : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे. आव्हाड यांचं ट्विट चर्चेत आलं आहे. 2024 च्या निवडणुकीसाठीचा भाजपचा मेगा प्लॅन ठरल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. वाचा सविस्तर...

भाजप आणि RSS ची बैठक, 2024 च्या निवडणुकीचा मेगा प्लॅन ठरला; जितेंद्र आव्हाड यांचा मोठा दावा
Follow us
| Updated on: Dec 21, 2023 | 12:17 PM

मुंबई | 21 डिसेंबर 2023 : काल हिवाळी अधिवेशन संपलं. काल विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडलं. या अधिवशेन कालात बऱ्या बाबींवर चर्चा झाली. राजकीय भेटीगाठी, बैठका झाल्या. या भेटीगाठींची भरपूर चर्चाही झाली. अशाच एका बैठकीवर राष्ट्रवादीचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका भेटीवर भाष्य केलं आहे. या भेटीचे अनेक राजकीय कंगोरेही आव्हांनी समोर आणले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी एक महत्वाचं ट्विट केलं आहे. यात त्यांनी भाजप आणि आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक झाल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 2024 ची निवडणूक आणि भाजपची भूमिका या बैठकीत ठरल्याचंही जितेंद्र आव्हाडांनी या ट्विटमध्ये म्हटलंय.

आव्हाड काय म्हणाले…

भाजप आणि आरएसएसमध्ये बैठक झाल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसंच या बैठकीत भाजपची रणनिती ठरल्याचंही आव्हाड म्हणालेत. 2024 ला महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची असेल त्यांना कमळावर निवडणूक लढवावी लागेल, असं आव्हाडांनी म्हटलंय. जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट जसंच्या तसं

नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नागपूरमध्ये भाजप -आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे ठरवण्यात आले. ज्यांच्यावर आरोप आहेत; ज्यांच्यावर डाग आहेत. त्यांना सोबत घेऊ नये, असे ठरविण्यात आले. ज्यांना राजकारण समजते; ज्यांना राजकीय जाण आहे. त्यांना लगेच समजले असेल की, महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी.महाराष्ट्रात पुढे काय होईल, हे सांगता येत नाही.

टीव्ही 9 मराठीशी बोलताना आव्हाड काय म्हणाले?

जितेंद्र आव्हाड यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना याबाबत खुलासा केला आहे. दुसऱ्या पक्षातील नेते माझे मित्र आहेत. त्यातून माहिती मिळाली की, भाजप तीन राज्यात जिंकल्यानंतर जोरात आहे. स्वत: निवडणूक जिंकू असा विश्वास भाजपला आहे. त्यामुळे त्यांची संघासोबत बैठक झाली. स्वबळावर लढवावी अशी इच्छा आहे. डाग लागलेले मंत्री बाजूला सारून निवडणूका लढवणार आहेत. शिंदे गटाचे बरेच खासदार कमळावर लढणार आहेत, असं आव्हाड म्हणाले.

भाजपचा मूळ मतदार रागावला होता. तो हे जवळ आल्याने लांब गेलाय. लढायचं असेल तर कमळावर लढा नाही तर सोडून द्या. संघ आणि भाजप पाच वर्षापुढची तयारी करतात. त्यांचे सर्वे झालाय. बैठक झाली याचा सोर्स सांगणार नाही. त्यांच्या काही मंत्र्यांमध्ये ही चर्चा मी ऐकली. लोकसभा एकत्र लढतील, विधानसभा मात्र वेगळे लढतील, असं आव्हाड म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.