“ताई, किती सोयीस्करपणे संवेदना जाग्या होतायेत, तुमचे बदलते रंग पाहून सरड्याला पण लाज वाटेल”

Chitra Wagh On Supriya Sule : मीरा रोड हत्याकांडावर प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा; श्रद्धा वालकर प्रकरणाचाही दिला संदर्भ

ताई, किती सोयीस्करपणे संवेदना जाग्या होतायेत, तुमचे बदलते रंग पाहून सरड्याला पण लाज वाटेल
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 3:51 PM

मुंबई : सुप्रिया ताई, तुमची रंग बदलण्याची कला पाहून सरड्याला पण लाज वाटली असेल… किती सोयीस्करपणे तुमच्या संवेदना जाग्या होताहेत हो…, असं म्हणत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. मीरा रोडमध्ये झालेल्या हत्याकांडाने अवघा महाराष्ट्र हादरला आहे. त्यावर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे.

तुमच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मंचरच्या मुलीसाठी तुमच्या संवेदना जाग्या झाल्या नाहीत… मुलीला मुस्लिम तरूणानं पळवून नेलं. ती अडीच वर्ष सापडली नाही. तेंव्हा तुमचंच लाडकं सरकार होतं… श्रद्धा वालकर प्रकरणात तुम्ही वेळीच लक्ष दिलं असतं तर तिचेही 35 तुकडे झाले नसते. वसुलीत मग्न असलेल्या तुमच्या गृहमंत्र्यांना श्रद्धा वालकरच्या आई वडिलांची हाक ऐकू आली नाही, हे ही दुर्दैवीच!, असं म्हणत चित्रा वाघ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

मीरा रोड प्रकरणात नक्कीच कारवाई होईल. दोषींची गय केली जाणार नाही कारण इथे गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस या सक्षम नेत्याकडे आहे. त्यासाठी तुम्हाला ‘मगरमच्छ के आंसू’ गाळण्याची गरज नाही, मोठठ्या ताई…, असं म्हणत चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे.

सुप्रिया सुळे यांंचं ट्विट

मुंबई येथील मीरा रोड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन् पार्टनरची हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून व मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना अतिशय भीषण, अमानुष आणि संतापजनक आहे. गुन्हेगारांना या राज्यात कायद्याचा धाक शिल्लक राहिलाच नाही अशी ही स्थिती आहे. महिलांवरील गुन्हे संतापजनक पद्धतीने वाढत आहेत. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खात्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या प्रकरणातील आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी तपासयंत्रणांनी प्रयत्न करावे, असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्याला चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं आहे.

मीरा रोड हत्याकांड

मुंबईतल्या मीरा रोड परिसरात घडलेल्या हत्याकांडाने महाराष्ट्र हळहळला आहे. मनोज सिन्हा ही व्यक्ती सरस्वती वैद्यसोबत तीन वर्षापासून लिव्ह इनमध्ये राहत होता. मनोज आणि सरस्वतीच्या फ्लॅटमध्ये पोलिसांनी मृतदेहाचे 12 ते 13 तुकडे सापडले आहेत. त्यानंतर पोलिसांनी इतर तुकडे मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या प्रकरणाने महाराष्ट्र हादरला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.