Chhatrapati Sambhajinagar Cabinet Meeting : …तर मी शिंदे सरकारच्या भूमिकेचं स्वागत करेन; जयंत पाटील काय म्हणाले?

Cabinet Meeting in Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगरमधील मंत्रिमंडळ बैठकीकडून विरोधी पक्षांना काय अपेक्षा?; जयंत पाटील यांनी केली 'ही' मागणी. म्हणाले ...तर मी शिंदे सरकारच्या भूमिकेचं स्वागत करेन.

Chhatrapati Sambhajinagar Cabinet Meeting : ...तर मी शिंदे सरकारच्या भूमिकेचं स्वागत करेन; जयंत पाटील काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Sep 16, 2023 | 12:15 PM

छत्रपती संभाजीनगर | 16 सप्टेंबर 2023 : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर आज संभाजीनगरमध्ये अख्ख राज्य मंत्रिमंडळ दाखल झालं आहे. आजपासून पुढचे दोन दिवस राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. या बैठकीसाठी येणाऱ्या अधिकारी आणि मंत्र्यांसाठी रेड कारपेट टाकण्यात आलंय. 7 वर्षानंतर मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. यंदा मराठवाडा मुक्ती संग्रामाचं 75 वं वर्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. यात मराठवाडा आणि संपूर्ण राज्यासाठी मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. याच बैठकीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

ट्विट करत जयंत पाटील यांनी राज्य सरकारच्या या बैठकीवर भाष्य केलंय. राज्यात सध्या पाऊस होत नाहीये. अशात सरकारने दुष्काळ केलेला नाही. अति उत्साहात सरकार सुमारे 40 हजार कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचं म्हटलंय. तशी बातमी पाहिली. तसं असेल तर त्याचं मी मी स्वागत करतो. आधी दिलेली आश्वासनंही पूर्ण केली जातील, अशी आशा व्यक्त करतो, असं जयंत पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणालेत.

जयंत पाटील यांचं ट्विट

मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप पीक हातातून गेलंय त्या पार्श्वभूमीवर आजची राज्यमंत्रिमंडळाची बैठक अतिशय महत्वाची आहे.

पंचनामे अजून झालेले नाहीत, दुष्काळ जाहीर केलेला नाही, शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या जिल्हा बँका आर्थिकरीत्या सक्षम नाहीत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. पुढची पिढी शेती करणार का? इतका गंभीर प्रश्न आहे.

शेतकरी आत्महत्येचं प्रमाण हे मराठवाड्यात सर्वात अधिक आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये बीड जिल्ह्यात १८६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ही मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याची स्थिती आहे. याकडे राज्य सरकारनं गंभीरपणे पहायला हवं.

इतर राज्यात, जिल्ह्यांमध्ये कामासाठी होणारे स्थलांतर अतिशय जास्त आहे. कोणताही मोठा उद्योग मराठवाड्यात आलेला नाही. त्यामुळं रोजगाराच्या बाबतीत इथल्या लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. छत्रपती संभाजीनगरला आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी पाटी आहे. पण विमान येतच नाही.

दुष्काळी परिस्थिती असताना आजच्या बैठकीला उत्सवाचं रूप दिले आहे. अति उत्साहात सरकार सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा निधी देणार अशी चर्चा माध्यमातून ऐकली. त्याचे मी स्वागत करतो. आधी दिलेली आश्वासनं देखील पूर्ण केली जातील अशी आशा करतो.

Non Stop LIVE Update
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....
'..त्यांच्या पाय चाटण्याला आक्षेप', देवेंद्र फडणवीस ठाकरेंवर भडकले अन्
'..त्यांच्या पाय चाटण्याला आक्षेप', देवेंद्र फडणवीस ठाकरेंवर भडकले अन्.
प्रचाररॅलीत कार्यकर्त्यांनी उडवले फटाके अन् ठिणगीन उमेदवाराचे केस जळले
प्रचाररॅलीत कार्यकर्त्यांनी उडवले फटाके अन् ठिणगीन उमेदवाराचे केस जळले.
चित्रा वाघ यांचं ट्वीट खरं की खोटं? नितीन राऊतांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर
चित्रा वाघ यांचं ट्वीट खरं की खोटं? नितीन राऊतांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर.
मनसेनं 'खुर्ची' टाकली, संजय राऊत 'खाट' टाकणार, राज ठाकरेंवर निशाणा
मनसेनं 'खुर्ची' टाकली, संजय राऊत 'खाट' टाकणार, राज ठाकरेंवर निशाणा.
पवारांच्या पत्नीला कंपनीत रोखलं, अर्धा तास खोळंबा अन्... काय घडलं?
पवारांच्या पत्नीला कंपनीत रोखलं, अर्धा तास खोळंबा अन्... काय घडलं?.
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.