राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कोण? शरद पवार की…; पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक, निर्णयाकडे देशाचं लक्ष

Sharad Pawar : अध्यक्षपदी शरद पवारच हवेत; राष्ट्रवादीचे नेते-कार्यकर्ते आक्रमक, मुंबईतील कार्यालय परिसर घोषणांनी दुमदुमला

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कोण? शरद पवार की...; पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक, निर्णयाकडे देशाचं लक्ष
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 11:14 AM

मुंबई : राष्ट्रवादी पक्ष, राष्ट्रवादीचं अध्यक्षपद आणि राष्ट्रवादीचे नेते-पदाधिकारी यांची मागणी-आंदोलनं… या गोष्टी मागच्या चार दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत आहेत. अशातच आज या सगळ्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडतेय. या बैठकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादीच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात निवड समितीची बैठक पार पडतेय. या बैठकीत राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय निर्णय होणार हे पाहणं महत्वाचं असेल.

बैठकीतील दोन प्रस्ताव

प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत दोन प्रस्ताव मांडले आहेत. पहिला म्हणजे शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या बैठकीत मांडण्यात आला आहे. तर शरद पवार पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष व्हावेत, असा दुसरा प्रस्ताव प्रफुल्ल पटेल यांनी मांडला आहे.

अध्यक्षपदाबाबत काय निर्णय होऊ शकतो?

शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यानंतर एकच चर्चा सुरू झाली की राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार? कार्यकर्ते जरी शरद पवार यांच्या नावासाठी आग्रही असले तरी आता अध्यक्षपदी कुणाची निवड होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे यांचं नाव आघाडी असल्याची माहिती आहे. पण जर सुप्रिया सुळे यांच्या नावाची निवड झाली नाही तर शरद पवार हे प्रमुख मार्गदर्शक राहतील आणि सुप्रिया सुळे यांना कार्यध्यक्ष केलं जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी

मुंबईतील प्रदेश कार्यलयाबाहेर राष्ट्रवादीचे हजारो नेते आणि कार्यकर्ते जमले आहेत. हे सगळे लोक शरद पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत आहेत. आम्हाला केवळ शरद पवार हेच अध्यक्ष हवे आहेत, असं या नेत्या आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

छगन भुजबळ यांची भूमिका

शरद पवार यांनी राजीनामा दिल्यापासून राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या नावावर ठाम आहेत. शरज पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असावेत, अशी ते मागणी करत आहेत. आजही छगन भुजबळ यांनी हीच भूमिका मांडली. पवारसाहेबांचा राजीनामा नामंजूर करणार आणि त्यांना सांगणार तुम्हीच अध्यक्ष राहायचं, असं छगन भुजबळ म्हणालेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.