निवड समितीचा निर्णय शरद पवारांसमोर मांडला; शरद पवारांनी निर्णय सांगितला, म्हणाले…
NCP Leaders Meets Sharad Pawar : राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण? शरद पवार यांचा निर्णय काय? पाहा...
मुंबई : राष्ट्र्वादीच्या महत्वाच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि भेटीदरम्यान निवड समितीचा निर्णय सांगितला आहे. त्यावर थोडा वेळ द्या मी विचार करून निर्णय देतो, असं शरद पवार म्हणाले आहेत. राष्ट्रवादीच्या निवड समितीची काहीवेळा आधी बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनिल तटकरे, शशिकांत शिंदे हे नेते सिल्व्हर ओकवर गेले. या नेत्यांनी निवड समितीचा निर्णय शरद पवार यांना सांगितला आहे. त्यावर शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार यांच्या समोर निवड समितीचा निर्णय ठेवला आहे. त्यानंतर शरद पवार यांनी आपला निर्णय या नेत्यांना सांगितला आहे. तुमचा प्रस्ताव माझ्यापर्यंत पोहोचला आहे. आता मला थोडा वेळ द्या मी विचार करून निर्णय सांगतो, असं शरद पवार म्हणालेत.
शरद पवार काय निर्णय घेणार?
राष्ट्रवादीची निवड समिती जो निर्णय घेणार तो मला मान्य असेल, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यामुळे शरद पवार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं असेल.
प्रस्ताव फेटाळला
राष्ट्रवादीच्या निवड समितीची बैठक पार पडली. यात दोन प्रस्ताव मांडण्यात आले आहेत. प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत दोन प्रस्ताव मांडले. शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा पहिला प्रस्ताव राष्ट्रवादीच्या बैठकीत मांडण्यात आला आहे. तर शरद पवार पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष व्हावेत, असा दुसरा प्रस्ताव प्रफुल्ल पटेल यांनी मांडला आहे. शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा प्रस्ताव प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत मांडला. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. निवड समितीने शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला आहे.
राष्ट्रवादीचं अध्यक्षपद
राष्ट्रवादीचं अध्यक्षपद कुणाकडे असणार याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होतेय. याबाबत आता शरद पवार काय निर्णय घेणं महत्वाचं असेल. शरद पवार मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहून सुप्रिया सुळे यांना कार्यध्यक्ष करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.त्यामुळे शरद पवार यांच्या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.