मुंबई : भाजपचे नेते नितेश राणे यांनी ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊतांवर एवढं बोलल्यावर त्यांनी उत्तर द्यायला हवं होतं. संजय राऊत यांनी हडतूड करून का होईना पण माझ्यावर बोलायला हवं होतं. पण त्यांनी तसं केलं नाही, असं नितेश राणे म्हणालेत. तसंच संजय राऊत लॅन्डमाफिया आहेत, असंही नितेश राणे म्हणालेत. उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी घणाघात केलाय.
नितेश राणे यांनी संजय राऊत यांचा लॅन्डमाफिया असा उल्लेख केला आहे. विक्रोळी आणि भांडूप भागात आर नावाचा जो बिल्डर आहे. त्यासोबत संजय राऊत यांची पार्टनरशिप आहे. त्याअंतर्गत जमिनी किती बळकावल्या. त्याचं उत्तर संजय राऊत या लॅन्डमाफियाने त्याला द्यावं, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
संजय राऊत यांना मला विचारायचं आहे की अलिबागच्या जो प्लॉट हवा होता. म्हणून तू एका मराठी कुटुंबाकडून कवडीमोल भावामध्ये दमदाटी करून जमीन घेतली. कोट्यावधीची जमीन अवघ्या 10-20 कोटींमध्ये घेतली. त्यामुळे दुसऱ्याला लॅन्डमाफिया म्हणणाऱ्याने आधी स्वत: कडे पाहावं, असं नितेश राणे म्हणालेत.
संजय राऊत सगळीकडे बोंबलत असतो की चुकीचा गुन्हा दाखल केला. कैदीनंबर 8959 संजय राऊत यांची पण तीच इच्छा आहे की, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कपडे मी फाडत राहावेत, असं नितेश राणे म्हणालेत.
महाविकास आघाडीत फूट पाडण्यासाठी संजय राऊत सामनाचा अग्रलेख लिहितात, असा घणाघात नितेश राणे यांनी केला आहे.
मागच्या 9 पासून महिन्यांपासून संजय राऊत राज्यात अशांतता पसरवण्याचं काम करत आहेत, असंही नितेश राणे म्हणालेत.
दंगली घडवण्याची प्लॅनिंग करण्यासाठी मातोश्रीवर बैठक झाली होती, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
अबू आझमीजी यांनी उद्धव ठाकरे यांचा खरा चेहरा ओळखून घ्यावा. दक्षिण मुंबईतील फेरीवाल्यांवर हल्ले झाले. उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले होते. दंगली घडवण्याचा प्रयत्न केला गेला. दंगली भडकावण्याचं काम माझं असेल, असं स्वत: उद्धव ठाकरे म्हणाले होते. मुसलमानांवर हल्ले करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले. तलवारीने त्यांच्यावर मुसलमानांवर हल्ला करण्याचे आदेश दिले. जेणे करून हिंदू-मुसलमान दंगली भडकतील आणि त्याचा फायदा शिवसेनेला होईल. असा त्यांचा डाव होता, असा घणाघात नितेश राणे यांनी केला आहे.