भाजप म्हणे ‘इन्कमिंग’चा आढावा, या ‘आऊट गोइंग’चं काय? सामनातून भाजपला सवाल

Saamana Editorial on BJP : निवडणुकीत मविआचं इन्कमिंग'तर युतीचं'आऊट गोइंग' सुरुये, त्याचं काय?; सामनातून भाजपला सवाल

भाजप म्हणे 'इन्कमिंग'चा आढावा, या 'आऊट गोइंग'चं काय? सामनातून भाजपला सवाल
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 9:00 AM

मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. यात निवडणुकीच्या निकालाचाही दाखल देण्यात आला आहे. “मिंधे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात झालेल्या सर्वच निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे जोरदार ‘इन्कमिंग’ आणि मिंधे गट-भाजपचे जोरदार ‘आऊट गोइंग’ होत आहे”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

परंपरागत मतदारांपासून नवीन मतदारांपर्यंत, शेतकरी-कष्टकऱ्यांपासून पदवीधर-सुशिक्षित मतदारांपर्यंत सगळेच भाजपपासून ‘आऊट गोइंग’ करीत आहेत हेच वास्तव आहे. तरीही कोणाला या ‘आऊट गोइंग’चे काय या वास्तवाकडे दुर्लक्ष करून ‘इन्कमिंग’च्या ‘मृगजळा’तच वावरायचे असेल तर त्यांना शुभेच्छा!, असं म्हणत सामनातून भाजपला टोला लगावण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचेही दिल्ली-मुंबई-महाराष्ट्र असे ‘अप-डाऊन’ वाढले आहे. वरचेवर ते नागपूर, कोल्हापूर, पुणे असे येत असतात. मुंबईवर तर त्यांचे विशेष प्रेम आहे. मुंबई महापालिकेवरही त्यांचा डोळा आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात त्यांनी दोनदा मुंबईला भेट दिली, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर टीका करण्यात आली आहे.

निवडणुका असोत अथवा नसोत, भाजपच्या नेते मंडळींचे दौरे, बैठका, चर्चा फक्त राजकीय लाभहानीचे हिशेब करण्यासाठीच असतात. विद्यमान भाजप श्रेष्ठी तर त्यांच्या भक्त मंडळींना या हिशेबात अतिहुशार आणि सत्ताकारणाच्या जुगारातील ‘चाणक्य’ वगैरे वाटतात. अशा या चाणक्यांचे मुंबई-महाराष्ट्रातील दौरे अलीकडे वरचेवर होऊ लागले आहेत. कारण स्पष्ट आहे.

महाविकास आघाडीच्या ‘वज्रमुठी’च्या तडाख्याने 2019 मध्ये त्यांचा येथील सत्तेचा घास हिरावला गेला आहे.त्यात आगामी लोकसभा, विधानसभा आणि मुंबईसह इतर महापालिकांच्या रखडलेल्या निवडणुका त्यांना खुणावू लागल्या आहेत, असं म्हणत सामनातून भाजपला टोला लगावण्यात आला आहे.

गेल्या वर्षी झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये ‘क्रमांक एक’चा दावा करणाऱ्या भाजप-मिंधे गटाला वास्तवात महाविकास आघाडीपेक्षा खूप कमी जागा मिळाल्या होत्या. सुमारे 225 ग्रामपंचायती महाविकास आघाडीच्या ताब्यात आल्या होत्या, तर भाजप-मिंधे गटाचा हाच आकडा 180 च्या आत होता. त्यानंतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही चारपैकी तीन जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. सर्व जागा जिंकण्याच्या गमजा मारणाऱ्या भाजपला जेमतेम एक जागा मिळाली होती. त्यातही भाजपच्या दोन परंपरागत मतदारसंघांत महाविकास आघाडीचे ‘इन्कमिंग’ करण्याचा चमत्कार सुशिक्षित मतदारांनी करून दाखवला होता, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.