Eknath Shinde : सरकारी रुग्णालयांना स्मशानकळा आलीये, मुख्यमंत्री कोठे आहेत?; सामना अग्रलेखातून शिंदेंना सवाल

Saamana Editorial on CM Eknath Shinde Delhi Daura : मुख्यमंत्री सर्कशीतल्या वाघाच्या भूमिकेत, दिल्लीला जाब विचारायचा सोडून ते...; सामनातून एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र

Eknath Shinde : सरकारी रुग्णालयांना स्मशानकळा आलीये, मुख्यमंत्री कोठे आहेत?; सामना अग्रलेखातून शिंदेंना सवाल
Follow us
| Updated on: Oct 07, 2023 | 7:53 AM

मुंबई | 07 ऑक्टोबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आठवड्यात दोनदा दिल्ली गेले. यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका करण्यात आली आहे. नांदेडसह राज्यातील इतर भागात रुग्ण दगावत आहेत. याला सरकार गांभिर्याने घेत नाही. उलट मुख्यमंत्री दिल्ली दौरा करत आहेत, असा घणाघात सामनातून करण्यात आलाय. मुख्यमंत्री शिंदे यांची सर्कशीतील वाघाशी तुलना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कोठे आहेत?, असा सवाल सामनातून करण्यात आला आहे.

सामना अग्रलेख जसाच्या तसा

महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, महिला बेहाल आहेत. सरकारी रुग्णालयांना स्मशानकळा आली आहे. रोज कुठे ना कुठे मृत्यूची छापेमारी सुरूच आहे. या सर्व तणावाच्या स्थितीत ना मुख्यमंत्री जागेवर आहेत ना दोन उपमुख्यमंत्री. लंडनवरून वाघनखे येतील, पण दिल्लीने महाराष्ट्राची नखे कापून वाघाच्या आयाळीस हात घातला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाब विचारायचे सोडून ते दिल्लीत जर्जर झालेल्या सर्कशीतल्या वाघाच्या भूमिकेत शिरून बसले आहेत. कोविड काळात गंगेत प्रेते तरंगत होती तशी प्रेते आता महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांत पडली आहेत, पण आपले स्वाभिमानी की काय ते मुख्यमंत्री कोठे आहेत? ते दिल्लीत काय करीत आहेत?

नक्षलवादाचा मुकाबला करण्यासंदर्भातील एक बैठक गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी दिल्लीत बोलावली. त्या बैठकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे हे एक दिवस आधीच दिल्लीत पोहोचले. महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयात मृत्यूचे थैमान सुरू असताना मुख्यमंत्री त्यांचे ‘बॉस’ अमित शहा यांच्या दरबारी वार लावून बसले आहेत. नक्षलवादाचा विषय गंभीर आहेच, पण सरकारी इस्पितळांतील बळी हा त्यापेक्षा जास्त चिंतेचा विषय आहे.

शिंदे हे अनेक वर्षांपासून गडचिरोलीचे पालकमंत्री पद भूषवीत आहेत. या पालकमंत्री पदाचा व नक्षलवाद्यांचा काहीएक संबंध नसून गडचिरोलीतील ‘माईनिंग’ उद्योगावर नियंत्रण राहावे व तेथील आर्थिक उलाढालीत सहभागी होता यावे यासाठी गडचिरोलीची योजना आहे. नक्षलवादाशी मुकाबला वगैरे फक्त बहाणा आहे. मुख्यमंत्री महोदयांचे बूड महाराष्ट्रात टिकत नाही व ते सतत दिल्लीस पळत आहेत. पालकमंत्री कुणाला नेमायचे, महामंडळांचे वाटप कसे करायचे, असे प्रश्न घेऊन मुख्यमंत्री ऊठसूट दिल्ली वाऱ्या करतात. स्वाभिमानासाठी पक्षत्याग करणाऱ्यांचे हे असे हाल सुरू आहेत.

दिल्लीने ‘ऊठ’ म्हटले की उठायचे व ‘बस’ म्हटले की बसायचे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या पायजम्याची नाडी दिल्लीच्या हातात आहे. त्यामुळे शिवसेना या महाराष्ट्र अभिमानी पक्षाचे नाव त्यांनी धुळीस मिळविले आहे. शिंदे गटाच्या विचारांतून, कृतीतून, जाहिरातींतून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव व छायाचित्र आता हटवले गेले आहे. आता फक्त ‘मोदी मोदी-शहा शहा’चा गजर सुरू आहे. उद्या ते शिवसेनेची स्थापना मोदींमुळे झाली, मोदींचीच शिवसेना खरी असे बोलायलाही कमी करणार नाहीत.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.