शरद पवार यांच्या आत्मचरित्रातील ‘त्या’ घटनाक्रमावर उद्धव ठाकरे यांचं परखड भाष्य; म्हणाले…

उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातील निर्णय आणि शरद पवार यांच्या आत्मचरित्रातील उल्लेख; उद्धव ठाकरे म्हणाले...

शरद पवार यांच्या आत्मचरित्रातील 'त्या' घटनाक्रमावर उद्धव ठाकरे यांचं परखड भाष्य; म्हणाले...
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 3:35 PM

मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. उद्धव ठाकरे यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. “प्रत्येक पक्षाने अंतर्गत काय करावं, याचा अधिकार त्यांना असतो. त्यांचा निर्णय त्यांना घेऊ द्या. त्यांचा निर्णय झाल्यावर काय बोलायचं ते बोलू, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

लोक माझे सांगाती हे शरद पवार यांचं आत्मचरित्र आणि त्यातील घटनांवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलंय.”कुणी काय लिहावं याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मी मुख्यमंत्री म्हणून काय काम केलं हे जगजाहीर आहे. माझी मतं ठाम आहेत. माझ्या मतांवर मी ठाम आहे. मला व्यक्तींचा किंवा मोदींचा पराभव करण्यासाठी नाहीतर वृत्तीचा पराभव करायचा आहे. माझ्याकडून महाविकास आघाडीला कोणतेही तडे जाणार नाहीत, असंही उद्धव ठाकरे यांनी ,स्पष्ट केलं आहे.

रिजीजू आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष काल भेटले. त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली माहिती नाही. कोर्टाचा निकाल येणार आहे. पवारसाहेबांशी माझं अजून बोलणं झालेलं नाही. त्यांचं सर्व होऊद्या मग सविस्तर बोलू, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

वज्रमूठ सभा आणि नियोजन

आम्ही सभेचा कार्यक्रम ठरवला होता. या सभा घेणं विचित्र वाटायला लागलं आहे. दुपारच्या वेळी ऊन खूप असतं. म्हणून या सभा मेनंतर घ्यायचा विचार सुरु आहे. पण माझी महाडची सभा होणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणूक

कर्नाटकमध्ये सध्या विधानसभा निवडणूक होतेय. त्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. कर्नाटक येथे बजरंग दलाचा विषय काढला गेलाय. पंतप्रधान बोलले आहेत की, बजरंग बली की जय असं म्हणून मतदान करा. मग आता निवडणुक आयोगाने बदल केले आहेत का? बाळासाहेब ठाकरे यांचं मतदान रद्द केलं होतं. कर्नाटकातील मराठी लोकांना आवाहन करतो की, तुम्ही जय भवानी जय शिवाजी म्हणून मतदान करा. तिथल्या मतदारांनी मराठी एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्या, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मी बारसूला जातोय पण कुणाती हिंमत बघायला जात नाहीये. मी लोकांना भेटायला जातो आहे. मी होतो तेव्हा केंद्रातून बोललं गेलं की हा प्रकल्प चांगला आहे. रिफायनरीमुळे प्रदूषण मान्य नाही. चांगले प्रकल्प गुजरातकडे गेले. प्रकल्प चांगला असेल तर लोकांसमोर सादरीकरण करा. लोकांच्या डोक्यावर बंदूक ठेवून परवानगी घेताय. कोणाच्या बाजू घेऊन येताय त्या जमिनी उपऱ्यांनी विकत घेतल्या आहेत, असंही ठाकरे म्हणालेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.