India Alliance Mumbai Meeting : उद्धव ठाकरेंच्या ‘या’ कृतीने हिंदुंच्या जखमेवर मीठ चोळलं; नितेश राणे यांचा घणाघात

Nitesh Rane on India Alliance and Uddhav Thackeray Mamata Banerjee Meeting : हिम्मत असेल तर राहुल गांधींना बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर घेऊन जा; नितेश राणे यांचं उद्धव ठाकरेंना आव्हान, म्हणाले, हे तर हिंदुंच्या जखमेवर मीठ चोळणं...

India Alliance Mumbai Meeting : उद्धव ठाकरेंच्या 'या' कृतीने हिंदुंच्या जखमेवर मीठ चोळलं; नितेश राणे यांचा घणाघात
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 12:44 PM

मुंबई | 31 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक हिंदूंना अस्वस्थ करणारी घटना काल मातोश्रीवर घडली. ज्या पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर अन्याय होतात. त्याच राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांना राखी बांधली. हे अतिशय निंदनीय आहे. उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाची व्याख्या काय? हे त्यांनी सांगावं. ज्या हिंदूंचा जीव गेला त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी काल केलं. या भेटीने हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या, असं म्हणत भाजपचे नेते नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. इंडिया बैठकीच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर ममता बॅनर्जी यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांना राखी बांधली. यावर नितेश राणे यांनी टीका केली आहे.

रोहिंगे आणि बांगलादेशी यांनी काल दिवाळी साजरी केली असेल. जर चुकून मुंबईची सत्ता ठाकरेंजवळ गेली. तर मुंबईत हिंदू कमी दिसतील आणि रोहेग्यांचीच मुंबई गर्दी होईल. संजय राऊत राहुल गांधी यांच्यासोबत वॅलेंटाइन डे साजरा करेल. काय योग्य आणि काय अयोग्य हे जयंत पाटील यांना समजत नसेल. बाळासाहेबांच्या विचारांना उद्धव ठाकरेंनी तिलांजली दिली आहे, असं नितेश राणे म्हणालेत.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांनी एक वक्तव्य केलं. माझ्यामागे संजय राऊत नावाचा ब्रँड, म्हणून मला 100 कोटींची ऑफर आली, असं सुनील राऊत म्हणालेत. त्याला नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. संजय राऊत देशी ब्रँड आहे. आम्ही पण वाट बघत आहोत हुकमाचा एक्का बाहेर कधी काढतात ते, असं नितेश राणे म्हणाले.

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांची झारखंडमध्ये सभा झाली. यावेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी ओवैसी यांनी घोषणा देणाऱ्यांना टोकलं. यावर नितेश राणे यांनी भाष्य केलं आहे.  असदुद्दीन ओवैसी हा पाकिस्तानचा एजंट आहे. त्यांना भारतात राहायला का द्यायचं? यांना पाकिस्तानमध्ये पाठवून द्या. भारतात राहायची यांची लायकी नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल झालेल्या प्रकारची चौकशी करावी, अशी मागणी आम्ही केलीय, असं म्हणत नितेश राणे यांनी ओवैसी यांच्यावर निशाणा साधला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.