मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांचं नाव लावायला लाज वाटायची, बॅनरवर फोटोही नसायचे; नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

| Updated on: Aug 07, 2023 | 10:54 AM

Nitesh Rane on Uddhav Thackeray : राहुल गांधी मुंबईत येतायेत, 'ही' एक गोष्ट करून दाखवाच; नितेश राणे यांचं उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज

मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांचं नाव लावायला लाज वाटायची, बॅनरवर फोटोही नसायचे; नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Follow us on

मुंबई | 08 ऑगस्ट 2023 : उद्धव ठाकरे आता बाळासाहेब ठाकरे यांचं नाव लावतात. पण जेव्हा ते मुख्यमंत्री होते. तेव्हा बाळासाहेबांचं नाव लावायला त्यांना लाज वाटत होती. बॅनर्सवरही उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचा फोटोही लावला नाही, असं म्हणत भाजप नेते, आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते मुंबईत टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

उद्धव ठाकरे यांना चॅलेंज देतो की, मुंबईत इंडियाची बैठक होणार आहे. एक तारखेला राहुल गांधी मुंबईत येत आहे. ज्या राहुल गांधींची तुम्ही चाटता. त्या राहुल गांधींना शिवतिर्थावर आणा. तिथं बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करायला सांगा. मग मी तुम्हाला मानतो, असं ही नितेश राणे म्हणाले आहेत.

शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडणारा औरंगजेबच. औरंग्याची वृत्ती देवेंद्र फडणवीस यांच्या भाडपचीच, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी काल टीका केली. त्यालाही नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात हिरवा वळवळणारा साप कोणी असेल तर तो आहे मुल्ला उद्धव ठाकरे! दुसऱ्यांना औरंग्या बोलू नका, ती तुमची वृत्ती आहे. तुमची नाही, असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.

उद्धव ठाकरे हा नमक हराम माणूस आहे. तो कुणाचाच झाला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे सख्या भावापेक्षाही जास्त लाड केले. आज त्याच देवेंद्रजींना हा नाव ठेवतोय, असाही घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

गेल्या दोन-तीन आठवड्यात ज्या कारवाया होत आहेत. रवींद्र वायकरांवर किशोरी पेडणेकरांवर एक बाप म्हणून उद्धव ठाकरेला आता त्रास व्हायला लागला आहे. त्यांना कळून चुकले की माझा मुलगा हा जेलमध्ये जाणार आहे. त्याची दिवाळी आर्थर रोड जेलमध्ये जाणार आहे. त्यातूनच ही वक्तव्य केली जात आहेत. मुलाबाबतची भीती बोलण्यातून जाणवते आहे. म्हणून भाजपावर देवेंद्रजींवर राग काढण्याचे काम सुरू आहे, असंही नितेश राणे म्हणालेत.

उद्धव ठाकरे हे स्वतः मस्टर लिहिण्याच्या तरी लायकीचे राहिले आहेत का? अशी टीका करून स्वतःची पात्रता महाराष्ट्राला दाखवत आहे. आमच्यासोबत जे येत आहेत. ते काय लहान मुलं नाहीत. एकनाथ शिंदेंना अजित पवारांना आम्ही बोलावलं का? ते स्वतः आमच्याकडे आले. त्यांना माहिती आहे की तुमच्यासोबत आता काहीही भविष्य नाहीये. म्हणून ते आमच्यासोबत येत आहेत, असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

नाना पटोले ओसाड गावचे पाटील! आधी सत्ता तर आणा. किती आमदार सोबत राहतील ते पाहा. मग मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पाहा, असं म्हणत नितेश राणे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टोला लगावला आहे.