आता आम्ही बोलणार! जे बाहेर येईल ते ऐकून घरात लपून रडत बसू नका; भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Nitesh Rane on Uddhav Thackeray : नपुसक, फावड्या म्हणत उद्धव ठाकरेंना डिवचलं, तर 2024 ला मोदींचे सरकार येणार अन् राऊत जेलमध्ये जाणार; भाजप नेत्याचा ठाकरे गटावर हल्लाबोल. भाजप आमदाराने ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

आता आम्ही बोलणार! जे बाहेर येईल ते ऐकून घरात लपून रडत बसू नका; भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 12:39 PM

मुंबई | 28 ऑगस्ट 2023 : आम्ही उद्धव ठाकरेंवर टीका करतो तेव्हा आमची जीभ घसरली अशी बातमी पसरते. पण एका उपमुख्यमंत्री यांच्यावर बोलताना उद्धव ठाकरेंची जीभ घसरली, असं कुणीही म्हणत नाही. पण आम्ही सगळं काही सूत समेत परत करू. आता जे जे बाहेर येईल ते ऐकून घरात बसून रडायचं नाही. लपून बसायचं नाही, असं म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे यांना मी नपुंसक म्हटलं तर राग येईल. फावड्या म्हटलं तरी राग येईल. यांनी सख्ख्या भावाबाबत काय केलं? स्वतःच्या वडिलांना तू आणि तुझं कुटुंब म्हातारा आणि कुत्रा म्हणायचे. तो म्हातारा जेवला का असं म्हणायचे. बाळासाहेब ठाकरे यांनी जे रुद्राक्ष घातलं होतं. ते यांनी फेकून दिलं, असे गंभीर आरोप नितेश राणे यांनी केले आहेत.

नितीन देसाई यांच्याबाबत अग्रलेख लिहिला गेला. नितीन देसाई ही चांगला व्यक्ती होती. त्यांचा स्टुडिओ त्यांनी विकत द्यावा आणि तो आम्हाला द्या असा कुणाचा दबाव होता? उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना तो स्टुडिओ हवा होता. नितीन देसाई यांना धमकी मातोश्रीच्या जवळच्या माणसाकडून येत होती, असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप लावलेत.

संजय राजाराम राऊत याचा मालक आणि त्याची मालकीण यांना हा स्टुडिओ हवा होता. संजय राजाराम राऊत याचं उत्तर दे! तुझा जो ठाकरे सिनेमा आला. त्याचं शूटिंग एनडी स्टुडिओत झालं. त्याचे पैसे दिलेत का? तुझ्या मालकाने आणि मालकीनेने का नितीन देसाईवर दबाव टाकला? साडे सातनंतर तुम्हाला डीनो लागतो आणि आता नितीन देसाई…, असं म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केलाय.

2024 ला मोदींचे सरकार येईल आणि हा आतमध्ये जाईल. तू आणि मालकाचा मुलगा एकत्र आर्थर रोड जेलमध्ये गोट्या खेळत बसणार आहात. एकनाथ शिंदे हे कौतुक करण्याच्या पात्रतेचे आहेत. म्हणून त्यांचं कौतुक होतं. तुझा मालक शिव्या खाण्याच्या लायक आहे, असा घणाघातही नितेश राणेंनी केला आहे.

कोण कुणाच्या पलंगावर झोपत हे बघण्याची संजय राऊत याची वृत्ती आहे. सुजित पाटकर याच्या घरात काय होत हे संजय राऊत याला माहीत असेल, असंही नितेश राणे म्हणालेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.