Mumbai Police Guidelines : मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय, रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत भोंग्यावर बंदी! सूत्रांची माहिती

मुंबईत रात्री 10 ते सकाळी 6 या कालावधील लाऊडस्पीकर लावण्यास बंद घालण्यात आली आहे. तशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलीय. इतकंच नाही तर सायलेन्स झोनमधील धार्मिक स्थळांना तर पूर्णपणे लाऊडस्पीकर बंदी घालण्यात आली आहे.

Mumbai Police Guidelines : मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय, रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत भोंग्यावर बंदी! सूत्रांची माहिती
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 7:25 PM

मुंबई : राज्यात मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यांवरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. इतकंच नाही तर मशिदींवरील भोंगे (Loudspeaker in Mosques) काढले नाही तर त्यासमोर लाऊडस्पीकर लावत हनुमान चालीसा लावण्याचे आदेशच राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत. राज ठाकरे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आता मुंबई पोलीस (Mumbai Police) सतर्क झाले आहेत. मुंबईत रात्री 10 ते सकाळी 6 या कालावधील लाऊडस्पीकर लावण्यास बंद घालण्यात आली आहे. तशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलीय. इतकंच नाही तर सायलेन्स झोनमधील धार्मिक स्थळांना तर पूर्णपणे लाऊडस्पीकर बंदी घालण्यात आली आहे. परवानगी न घेता अनधिकृतपणे लाऊडस्पीकर लावणाऱ्यांवर कारवाईही करण्यात येणार आहे.

लाऊडस्पीकरबाबत मुंबई पोलिसांची नियमावली काय?

  • मुंबईत रात्री 10 ते सकाळी 6 या कालावधीत लाऊडस्पीकरला पूर्णपणे
  • सायलेंट झोनमध्ये लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी नाही
  • मुंबईत प्रत्येक पोलीस ठाण्यात एक टीम असणार
  • कंट्रोल रुमला फोन आल्यानंतर कारवाई होणार
  • लाऊडस्पीकरबाबतच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई
  • प्रक्षोभक, दोन समाजात तेढ निर्माण होईल असं भाषण करणाऱ्यांविरोधात कारवाई होणार
  • प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्यांची यादी तयार केली जाणार
  • अशा लोकांना मुंबई पोलिसांकडून प्रिव्हेंटिव्ह नोटीस पाठवली जाणार
  • कोणत्याही मंदिराला, मशिदीली लाऊडस्पीकर लावण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार
  • परवानगी मागणाऱ्याची इमारत अनधिकृत नाही ना याची चौकशी होणार
  • सायलेंट झोनमधील कोणत्याही धार्मिक स्थळाला लाऊडस्पीकरची परवानगी दिली जाणार नाही

नाशिकमध्ये मशिदींमधील भोंग्यांचे डेसिबल मोजले

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी धार्मिक स्थळांवरील भोंग्याचे डेसिबल मोजण्याचे आदेश दिले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त टीमकडून भोंग्यांचे डेसिबल मोजण्याचे काम करण्यात आले. त्यासाठी त्यांनी डेसिबल मोजण्यासाठी विशेष ट्रेनिंग देण्यात आलं. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांकडून सय्यद पिंप्री गावात मशिदीत नमाज सुरु झाल्यानंतर भोंग्याचं डेसिबलही मोजण्यात आलं.

3 मे रोजी मनसेची महाआरती आणि हनुमान चालिसा

येत्या 3 मे रोजी मनसेकडून राज्यभर महाआरती आणि हनुमान चालिसा करण्यात येणार आहे. 3 मे रोजी ईद असली तरी त्याच दिवशी अक्षय तृत्तीयाही आहे. त्यामुळे त्या दिवशी राज्यात महाआरती आणि हनुमान चालिसाचं आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवतीर्थावर आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे

इतर बातम्या : 

Jahangirpuri Encrochment : अतिक्रमण हटवताना दिल्लीतल्या जहांगिरपुरीत भेदाभेद? मशिदीसमोरच्या अतिक्रमणावरही बुलडोजर

Bala Nandgaonkar: मंदिरात CCTV, पण मस्जिदीत आहेत का? बाळा नांदगावकरांचा सवाल आणि त्यावरची उत्तरं…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.