जेलमधून बाहेर येताच अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या भेटीला; मलिकांच्या भूमिकेकडे लक्ष

Ajit Pawar Group Leader Meet Nawab Malik : अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या भेटीला; नवाब मलिक यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष. प्रफुल्ल पटेल यांनी या भेटीचे तपशील दिले आहेत. वाचा सविस्तर...

जेलमधून बाहेर येताच अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या भेटीला; मलिकांच्या भूमिकेकडे लक्ष
Follow us
| Updated on: Aug 15, 2023 | 1:17 PM

मुंबई | 15 ऑगस्ट 2023 :  राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते नवाब मलिक यांना चार दिवसांआधी जामीन मंजूर झाला आहे. दोन महिन्यांच्या जामीनावर नवाब मलिक बाहेर आबहेत. प्रकृतीच्या कारणावरुन त्यांना जामीन देण्यात आला आहे. त्यांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेत्यांनी नवाब मलिक यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, अजित पवार गटाच्या युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

नवाब मलिक तुरुंगात असतानाच राष्ट्रवादीत फूट पडली आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर भाजपशी हातमिळवणी शक्य नसल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलं आहे. नवाब मलिक सध्या जामीनावर आहेत. अशा परिस्थितीत नवाब मलिक यांची भूमिका काय असणार याकडे राष्ट्रवादीसह राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.

प्रफुल पटेल यांनी या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिक यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. 16 महिन्यानंतर त्यांना जामीन मिळाला आहे. तुमच्यासोबत आहोत हे सांगण्यासाठी आम्ही आलो होतो. असं त्यांनी सांगितलं.

राजकीय विषयावर चर्चा केलेली नाही. 25-30 वर्षांपासून आम्ही एकत्र आहोत. माणुसकी म्हणून, मित्र म्हणून त्यांना भेटायला आलो. ही केवळ सदिच्छा भेट होती. राजकीय भेट नव्हती. दुसरा कुठलाही अर्थ काढू नका.त्यांची प्रकृती सुधारल्याशिवाय दुसरे कुठलेही काम त्यांनी करू नये, असंच आमचं म्हणणं आहे, असं प्रफुल्ल पटेल म्हणालेत.

नवाब मलिक यांच्या जामीनाचं कारण काय?

कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात 23 फेब्रुवारी 2022 या दिवशी नवाब मलिक यांनी ईडीने अटक केली होती. तब्बल दीड वर्षांनंतर नवाब मलिक यांना प्रकृतीच्या कारणामुळे दोन महिन्यांचा जामीन मिळाला आहे. नवाब मलिक यांना किडनीचा आजार आहे. त्यांची किडनी निकामी झाली आहे. या आजारावर उपचारांसाठी जामीनाची मागणी नवाब मलिक यांनी केली होती. ती मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली. त्यानंतर त्यांना जामीन देण्यात आला.

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.