“पेटीत उद्धव-आदित्य नावाचे दोन नासके आंबे होते, एकनाथ शिंदेंनी ते बाहेर काढले आणि पेटी स्वच्छ केली”

Mumbai News : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांवर भाजप आमदाराची टीका तर एकनाथ शिंदे यांचं तोंडभरून कौतुक; पाहा काय म्हणाले...

पेटीत उद्धव-आदित्य नावाचे दोन नासके आंबे होते, एकनाथ शिंदेंनी ते बाहेर काढले आणि पेटी स्वच्छ केली
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 1:54 PM

मुंबई | 08 ऑगस्ट 2023 : भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. पेटीत उद्धव नावाचा आणि आदित्य नावाचे नासके आंबे होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पेटीतून हे दोन नासके आंबे बाहेर काढले आणि आता संपूर्ण पेटी स्वच्छ केली आहे, असं प्रसाद लाड म्हणालेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला त्यांनी उत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे यांना येड लागलंय. उद्धव ठाकरेंची जर मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती तर मग संजय राऊत, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री का केलं नाही? त्यांना जर मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर त्यावेळी देवेंद्रजींना मुख्यमंत्री करायचं होतं. उद्धव ठाकरे यांचे खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे आहेत, असा सवाल प्रसाद लाड यांनी विचारला आहे.

राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांच्यावरती आता संजय राऊत टीका करू लागले आहेत. मला वाटतं की ही त्यांची राजकीय अपरिपक्वता आहे. संजय राऊतांचं नाचता येईना अंगण वाकडं असं झालंय. बोलायला काय मुद्दे राहिले नाहीत. सरकार चांगलं काम करत आहे. त्यामुळे त्यांची गोची झाली. त्यातून अशी वक्तव्य केली जात आहेत, असं प्रसाद लाड म्हणालेत.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर टीका करण्याची संजय राऊत यांची लायकी नाही. सामना पेपर वाचतात. कोण मच्छी आणण्यासाठी तर कुणी बाजारातून फळं आणण्यासाठी, भाजी बांधाण्यासाठी सामना पेपरचा वापर होतो, असं म्हणत सामना अग्रलेखावर लाड यांनी टीका केली.

राज ठाकरे यांनी बाळासाहेबांसोबत आयुष्यातील सुवर्णकाळ अनुभवला आहे. त्यांच्याकडे तसे बरेचसे फोटोज आहेत. बऱ्याचशा आठवणी त्यांनी संकलित करून ठेवलेल्या आहेत. आता त्याची गरज आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे त्यांना फोन करू शकतात. उद्धव ठाकरे यांनी वन्य प्राण्यांचे फोटोग्राफी केली. पण त्यांना बाळासाहेबांचा फोटो काढण्याची कधी इच्छा झाली नाही, असं म्हणतही त्यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे.

राज ठाकरे हे देखील ठाकरे आहेत. ते स्वाभिमान काळातील आहेत. पण स्मारकासाठी जी काही मदत लागेल ती ते निश्चित करतील, असा विश्वासही प्रसाद लाड यांनी व्यक्त केला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.