Sanjay Raut : जर काँग्रेस गंजलेल्या लोखंडासारखा तर भाजप…; संजय राऊतांचा निशाणा

Saamana Editorial on BJP and Congress : काँग्रेसचा गंज उतरू लागलाय आणि लोखंडही सोन्यासारखं उजळून निघेल, पण गांजलेल्यांचे काय?; सामनातून संजय राऊतांचा निशाणा. राऊतांनी काँग्रेसचं कौतुक केलंय. तर भाजपवर मात्र निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर...

Sanjay Raut : जर काँग्रेस गंजलेल्या लोखंडासारखा तर भाजप...; संजय राऊतांचा निशाणा
Follow us
| Updated on: Sep 27, 2023 | 8:54 AM

मुंबई | 27 सप्टेंबर 2023 : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. काँग्रेस जर गंजलेला पक्ष असेल. तर भाजप हा गांजलेला पक्ष आहे, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.काँग्रेसचा गंज उतरू लागलाय आणि लोखंडही सोन्यासारखं उजळून निघेल, पण गांजलेल्यांचे काय?, असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. ‘काँग्रेसमुक्त भारत’ करण्याचं भाजपचं स्वप्न अधुरं राहिलं आहे, असं ते म्हणालेत. ‘गंजलेले आणि गांजलेले’ या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे.

सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा

काँग्रेस हा गंजलेल्या लोखंडासारखा आहे असे तुम्ही म्हणत असाल, पण भाजप हा विचार नसलेल्या पोकळ बांबूसारखा झाला आहे. गंजलेल्या लोखंडावर काँग्रेसचा डोलारा तरला आहे, पण मोदी-शहांच्या वेस्ट इंडिया कंपनीचे काय?

ईस्ट इंडिया जे कायदे पाळत होती तेवढेही कायदे मोदी-शहांची कंपनी पाळायला तयार नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात बेकायदेशीर, घटनाबाह्य सरकारला वाचवण्याचा निर्लज्ज प्रयत्न सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे सरकार बेकायदा ठरवूनही ते सरकार चालू देणे हे गंजलेल्या मेंदूचे व गांजलेल्या विचारांचे लक्षण आहे. काँग्रेस गंजलेले लोखंड असेल तर भाजप हा ‘गांजलेला’ पक्ष आहे. गंज काढण्याच्या अनेक उपाययोजना आहेत. गांजलेल्यांचे वैफल्य व नैराश्य दूर करणे कठीण असते. काँग्रेसचा गंज उतरू लागला आहे व लोखंडही सोन्यासारखे उजळून निघेल, पण गांजलेल्यांचे काय?

काँग्रेस पक्ष हा गंज आलेल्या लोखंडासारखा असून त्याचा ताबा आता ‘शहरी नक्षलवाद्यां’कडे आहे असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. पंतप्रधान सध्या सर्व लवाजमा घेऊन निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांत दौरे करीत आहेत. आपण देशाचे पंतप्रधान आहोत याचे भान न ठेवता ते भाजपच्या मेळाव्यांतून भाषणे करीत आहेत.

मोदींचे म्हणणे आहे की, ”सर्वात आधी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष संपला आणि त्यानंतर दिवाळखोरीत निघाला. आता हा पक्ष भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला गेला असून त्याचे कंत्राट शहरी नक्षलवाद्यांना मिळाले आहे.”मोदी यांचे हे विधान राजकीय संस्कृती व सभ्यतेस धरून नाही. काँग्रेस पक्ष संपला असे मोदी म्हणतात, पण गेल्या नऊ वर्षांत असा एकही दिवस गेला नाही की, मोदींनी काँग्रेसचा जप केला नाही. ‘काँग्रेसमुक्त भारत’ ही अलोकशाहीवादी गर्जना त्यांनी केली, पण त्यांना काँग्रेसला संपवता आले नाही.

मोदी यांना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस अशा अनेक पक्षांना संपवायचे आहे, पण त्यांना लडाखमध्ये घुसलेल्या चीनला संपवायचे नाही. त्यांना महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार संपवायचे नाहीत. त्यांना काँग्रेसला संपवायचे आहे, पण मोदी व त्यांच्या लोकांना काँग्रेस, शिवसेना महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला संपवता आले नाही. खरं म्हणजे मोदी-शहांच्या वेस्ट इंडिया कंपनीला काहीच संपवता आलेले नाही. ईडी, सीबीआय हाताशी नसेल तर या वेस्ट इंडिया कंपनीच्या मालकांना रस्त्यावर फिरणे कठीण होईल, असे देशाचे वातावरण आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.