Election 2023 : पाच राज्यातील निवडणूका ही मोदी सरकारच्या निरोपाची नांदी!; सामनातून विधानसभा निवडणुकांवर भाष्य

| Updated on: Oct 10, 2023 | 8:26 AM

Saamana Editorial on Vidhansabha Election 2023 : सामनाच्या आजच्या अग्रलेखातून विधानसभा निवडणुकांवर भाष्य करण्यात आलं आहे. यात या निवडणूका म्हणजे सेमी फायनल असल्याचं म्हणण्यात आलं आहे. तसंच मोदी सरकारच्या निरोपाची ही नांदी असल्याचं म्हणण्यात आलं आहे. वाचा सविस्तर...

Election 2023 : पाच राज्यातील निवडणूका ही मोदी सरकारच्या निरोपाची नांदी!; सामनातून विधानसभा निवडणुकांवर भाष्य
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : काल पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाना आणि मिझोरम या तीन राज्यात विधानसभा निवडणुका होई घातल्या आहेत. काल निवडणूक आयोगाकडून याची घोषणा करण्यात आली आहे. सात नोव्हेंबर ते तीन डिसेंबरपर्यंत या निवडणूका पार पडतील. या निवडणुकांवर आजच्या सामनातून भाष्य करण्यात आलं आहे. निवडणुकांवर भाष्य करताना आजच्या सामनातून भाजपवरही घणाघात करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. ‘निरोपाची नांदी!’ शीर्षकाखाली आजचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. पाच राज्यातील निवडणूका ही मोदी सरकारच्या निरोपाची नांदी असेल, असं आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे.

सामना अग्रलेख जसाच्या तसा

पाच पैकी चार राज्यांतील निकालांचा फायदा काँग्रेस आणि विरोधीपक्षांनाच होणार हे निश्चित आहे. त्यामुळेच बिथरलेला भाजप आटापिटा करीत आहे. त्यात ‘लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल’च्या निवडणुकीतील दारुण पराभवाचे पाणी आता भाजपच्या नाकातोंडात गेले आहे . लडाखमधील भाजपचा धुव्वा ‘ इंडिया ‘ आघाडीसाठी आणि पर्यायाने देशासाठी शुभशकूनच आहे . या शुभमुहूर्तावरच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर व्हाव्यात हादेखील एक चांगला योगायोग आहे . पाच राज्यांत वाजलेला विधानसभा निवडणुकांचा बिगुल ही मोदी सरकारच्या निरोपाची नांदी ठरणार आहे!

‘मिनी लोकसभा’ म्हणून पाहिले जाईल अशा पाच राज्यांतील विधानसभांच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. पंतप्रधान मोदी गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगड, तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेशात जाऊन आरोपांच्या फैरी झाडू लागले होते. देशासमोर अनेक गंभीर समस्या असताना त्यावर बोलायचे सोडून मोदी विरोधकांवर फैरी झाडू लागले तेव्हाच पाच राज्यांतील निवडणुका कधीही जाहीर होतील हे स्पष्ट झाले होते. निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली हे लोकशाहीवर मोठे उपकारच झाले म्हणायला हवे.

पाचही राज्यांत मागील काही दिवसांपासूनच तेथील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून घोषणा, आश्वासने, जाहीर सभा, रोड शो यांचा गदारोळ सुरूच आहे. त्याला आता निवडणुकांचा कार्यक्रमच जाहीर झाल्याने आणखी वेग येईल. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका केंद्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसाठी ‘सेमी-फायनल’च असणार आहेत. काँग्रेस, शिवसेनेसह देशातील प्रमुख 28 विरोधी पक्षांची ‘इंडिया’ आघाडीच्या वाढत्या भीतीमुळे भाजपने आता मारून मुटकून ‘एनडीए’ची गोळाबेरीज केली असली तरी पाच राज्यांसह आगामी लोकसभा निवडणुकीत त्याची वजाबाकीच होणार आहे.