मुख्यमंत्र्यांना कुणी जुमानत नाही, गॅंगवॉरसारखी परिस्थिती; संजय राऊत यांचं सर्वात मोठं वक्तव्य

Sanjay Raut on CM Eknath Shinde : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सर्वात मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी टार्गेट केलं आहे. मुख्यमंत्र्यांना कुणी जुमानत नाही, असं संजय राऊत म्हणालेत. संजय राऊत यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेवरही प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्र्यांना कुणी जुमानत नाही, गॅंगवॉरसारखी परिस्थिती; संजय राऊत यांचं सर्वात मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Nov 09, 2023 | 12:01 PM

मुंबई | 09 नोव्हेंबर 2023 : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत शिंदेगटावर वारंवार टीका करतात. शेलक्या शब्दात ते शिंदे गटाचे वाभाडे काढतात. पण आज संजय राऊत यांनी सर्वात मोठं वक्तव्य केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून घमासान सुरू आहे. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये हा महाराष्ट्राचा जातीपातीमध्ये तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. या महाराष्ट्रामध्ये कमजोर अस्थिर सरकार बसलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कुणी जुमानत नाही. भाजप यांना जुमानत नाही. कॅबिनेटमध्ये गॅंगवॉरसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, असं संजय राऊत म्हणालेत. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

शिंदेंवर निशाणा

एखाद्या मंत्र्याच्या अंगावर दुसरा मंत्री धावून जाण्याची परिस्थिती सुरू आहे. ही परिस्थिती याआधी निर्माण झाली नव्हती. मुख्यमंत्री जर आपल्या मंत्र्यांवरती नियंत्रण मिळू शकत नाहीत. तर राज्याचा प्रमुख म्हणून बसण्याचा त्यांना अधिकार नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे.

“तर महाराष्ट्राची बेअब्रू होईल”

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबर ही डेडलाईन दिली आहे. 24 डिसेंबरनंतर या महाराष्ट्रात काय होईल, हे कोणी सांगू शकत नाही. जरांगे पाटील यांनी मुंबईचा नाक बंद करण्याचा इशारा दिला आहे. जर मुख्यमंत्र्यांनी एक गांभीर्यानं घेतलं नाही. तर या देशात महाराष्ट्राची बेअब्रू होईल, असं संजय राऊत म्हणालेत.

भुजबळांच्या भूमिकेवर म्हणाले?

छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या दिल्या जाणाऱ्या आरक्षणाला विरोध केला आहे. तसंत ओबीसींच्या हक्कांसाठी ते लढत आहेत. त्यांच्या या भूमिकेवर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ मंत्री आहेत. ते ओबीसी समाजाला नेहमी मार्गदर्शन करत असतात. त्यांच्याकडे जर माहिती असेल त्यांनी ती पोलिसांना द्यावी. मुख्यमंत्र्यांकडे द्यावी समोर ठेवावी. हवेत गोळीबार करून काय होतं?, असं संजय राऊत म्हणालेत.

मुख्यमंत्री आणि त्यांच्या लोकांची जी माफियागिरी सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात निर्माण केलेल्या शाखा या तुम्ही ताब्यात घेत आहे. बुलडोजर फिरवत आहात. ही मस्ती फार काळ राहणार नाही. उद्धव ठाकरे आणि आम्ही 11 तारीखला चाललो आहोत. पाहू काय होतं ते, असं संजय राऊत म्हणालेत.

लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?.
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?.
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....