आम्हाला निमंत्रण नाही, पण उद्धव ठाकरे अयोध्येला गेले तर…; संजय राऊतांनी सरळ-सरळ सांगितलं…

Sanjay Raut on Ram Mandir Inauguration : राम मंदिराचं उद्घाटन आणि आमंत्रण... यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. आम्हाला निमंत्रण नाही, पण उद्धव ठाकरे अयोध्येला गेले तर... संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत सरळ-सरळ सांगितलं. वाचा सविस्तर...

आम्हाला निमंत्रण नाही, पण उद्धव ठाकरे अयोध्येला गेले तर...; संजय राऊतांनी सरळ-सरळ सांगितलं...
Follow us
| Updated on: Dec 22, 2023 | 11:17 AM

गणेश थोरात, प्रतिनिधी-टीव्ही 9 मराठी, मुंबई | 22 डिसेंबर 2023 : राम मंदिराचं येत्या 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाला शिवसेनेला निमंत्रण नाही. उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नाही. बाळासाहेब ठाकरे यांना देखील त्यांनी निमंत्रण दिलं नसतं. कारण हे श्रेय घेण्याचं राजकीय चढाईचा भाग बनला आहे. राम मंदिर उद्घाटन सोहळा अयोध्येमध्ये राम मंदिर बनना शिवसेनेचे मोठं योगदान आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं देखील योगदान मोठं आहे आहे. आम्हाला ते बोलणार नाही. उद्धव ठाकरे त्या ठिकाणी गेले तर बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा जयजयकार होईल, असं संजय राऊत म्हणालेत.

राम मंदिरासाठी ज्या लोकांनी योगदान दिलं आहे. त्यांना हे लोक कधीच सन्मानाने बोलवणार नाहीत. प्रभू श्रीराम हे सर्वांचे आहेत. ते एका राजकीय पक्षाचे किंवा नेत्याची जहागीर नाहीत. एकदा त्यांचा राजकीय सोहळा होऊ जाऊ द्या. मग आम्ही धार्मिक उत्सव करू, असं राऊतांनी म्हटलं आहे.

शिवसेना किती जागा लढवणार?

उद्धव ठाकरे दिल्लीत गेले. तेव्हा राहुल गांधी, सोनिया गांधी ,खर्गे आम्ही एकत्र बसून चर्चा केली आहे. त्या चर्चेत काय घडलं ते आम्हालाच माहिती आहे. जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रात नाही दिल्लीत त्याची चर्चा होईल. काँग्रेस हायकमांड समोर होईल. शिवसेना -आम्ही 23 जागा लढवणार, असं राऊतांनी स्पष्ट केलं.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर…

देशाची सुरक्षा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पूर्णपणे खेळखंडोबा केला आहे. जम्मू काश्मीर येथील जवानांवरती हल्ला झाला. 370 कलम हटवल्यानंतर हे उत्सव साजरा करत आहेत. संसदेत बेरोजगार तरुण घुसतात. संसदेच्या सुरक्षेला तडे मारतात. संसदेत चर्चा होऊन दिली जात नाही दीडशे खासदार निलंबित करतात. पुलवामा प्रमाणे हल्ला केला जातो. हे देशाचे दुर्दैव आहे हा मिनी पुलवामा हल्ला सध्या काश्मीरमध्ये झाला आहे. उघड्या डोळ्यांनी कत्तल होत आहे आणि राम मंदिर यांची घंटा वाजवायला ते जात आहे या घंटा त्यांच्या डोक्यात आपटल्या पाहिजेत, असं राऊतांनी म्हटलंय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.