Sanjay Raut : ‘या’ खासदाराला पक्षातून काढा, खासदारकी रद्द करा; संजय राऊत आक्रमक
MP Sanjay Raut on Ramesh Bidhuri : एकीकडे पंतप्रधान संसदत एकता आणि एकात्मतेवर बोलतात अन् त्यांच्याच पक्षाचे खासदार अशी वक्तव्य करतात. त्या खासदाराला पक्षातून काढा, त्यांची खासदारकी रद्द करा, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी मोदी सरकारवरही निशाणा साधला आहे.
मुंबई | 23 सप्टेंबर 2023 : रमेश बिधुरी हे कुठल्या भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत? एखाद्या लोकप्रतिनिधीने एखाद्या मुद्द्यावर आवाज उठवल्यावर अशा प्रकारे वक्तव्य करणं चूक आहे. हे सगळं नवीन संसदमध्ये होत आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदमध्ये भाषणामध्ये एकता आणि एकात्मता भाषण करतात. तेच त्यांच्या पक्षाचे खासदार अशा प्रकारची भाषा करतात. त्यांना लवकरात लवकर पक्षातून आणि लोकसभेत न काढून टाकावं. त्यांची खासदारकी रद्द करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप रमेश बिधुडी यांच्या वक्तव्यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
रमेश बिधुरी यांना नोटीस दिली असली तरी ती सगळी नौटंकी आहे. राजनाथ सिंह माफी मागत आहेत. ते त्यांचं मोठेपण आहे. ते जुन्या भाजपचं प्रतिनिधित्व करत आहेत. ते आजच्या भाजपला रिप्रेझंट करत नाहीत. ज्या भाजपमध्ये संस्कार राष्ट्रभक्ती होती ती आता दिसून येत नाही. अशा बाबत कुठल्याही भाजपच्या लोकांवरती कारवाई झालेली नाही. पण आता यावर जनता कारवाई करेल. अशा प्रकारे जी भाषा वापरली जात आहे. ते पाहता सध्या अमृतकाल नाही. ते विषकाल सुरू झाला आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
आम्ही बघत आहोत की रमेश बिधुरी यांच्यावरती काय कारवाई होणार आहे. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने विधानसभा अध्यक्ष बसलेले आहेत. त्याबाबत विधानसभा अध्यक्ष काय राजकारण करत आहेत. या ठिकाणचे विधानसभा अध्यक्ष गेल्या सहा सात महिन्यापासून काय करत आहे हे देखील आम्ही बघत आहोतय काय राजकारण करत आहेत ते देखील आम्ही पाहत आहोत .महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हे स्वतःला बादशहा मानत असतील. मी जे करणार तेच होईल, असा त्यांचा समज असेल. तर तीच बादशाही एक दिवस संपेल. जनता ती संपवेल, असं म्हणत संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेवर टीकास्त्र डागलंय.
कॅनडा आणि भारत यांच्यात खलिस्तान संघर्ष सुरू आहे. या विषयाचं राजकारण होऊ नये. खलिस्तान चळवळीने पंजाब दिल्ली सर्वत्र पुण्यामध्ये जो प्रकार केलेला आहे त्या आठवणी ताज्या आहेत. आम्ही पंतप्रधान लष्कर प्रमुख अनेक लोक गमावले आहेत .खलिस्तान चळवळीमध्ये गमावले आहेत. पाकिस्तान विरुद्ध भारत हे राजकारण चालणार नाही, तर दुसरीकडे खलिस्तान विरुद्ध भारत असं अजेंडा 2024 काही जण करत असतील तर या देशातील सुरक्षेच्या आणि एकात्मतेच्या संदर्भात खेळत आहे. कॅनडामध्ये खलिस्तानचे चळवळीचे केंद्र 40 वर्षे राहिले आहे. त्यामुळे भारत सरकारने कॅनडाबरोबर चर्चा करणं गरजेचं आहे, असं संजय राऊत म्हणालेत.