अजित पवार यांनी केलेल्या घोटाळ्यांची यादी घेऊन निवडणुकीत प्रचार करणार; कुणी दिला इशारा

| Updated on: Jul 08, 2023 | 2:23 PM

Shalinitai Patil on Ajit Pawar : अजित पवार आश्रयासाठी भाजपसोबत गेलेत, त्यांनी चूक केलीय, त्यांना अभय मिळणार नाही; कुणी केली घणाघात?

अजित पवार यांनी केलेल्या घोटाळ्यांची यादी घेऊन निवडणुकीत प्रचार करणार; कुणी दिला इशारा
Follow us on

मुंबई : अजित पवार यांनी चूक केलीय. ते आश्रयासाठी भाजपसोबत गेले आहेत. अजित पवार यांनी अपराध केलेत. तेच लपवायला ते भाजपसोबत गेले आहेत, असं राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि माजी महसूल मंत्री शालिनीताई पाटील यांनी म्हटलं आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना शालिनीताई पाटील यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय.

अजित पवार यांनी भाजपसोबत हात मिळवणी केली आहे. अजित पवार यांच्या राज्याचं उपमुख्यमंत्रिपद आहे. तसंच राष्ट्रवादी पक्षावर आणि घड्याळ चिन्हावरही त्यांनी दावा केला आहे. त्यावर शालिनीताई पाटील यांनी टीका केली आहे.

अजित पवार हे घोटाळेबाज आहेत. अजित पवारांनी शिखर बँकेमध्ये 25000 कोटींचा घोटाळा केलेला आहे. आम्ही याबद्दल तक्रार केली. दहा दिवसांनी त्यांना समान चालक आणि शरद पवार यांनी त्यांना याआधी देखील वाचवण्याचं काम केलेला आहे. ते स्वतः ईडी ऑफिसला गेले होते. त्यांना त्यांचा प्रभाव होता. मात्र काकांनाच आता क्रॉस करून अजित पवार जे आहेत ते भाजपच्या आश्रयाला गेलेले आहेत. तिथेही त्यांना अभय मिळणार नाही, असं शालिनीताई पाटील म्हणाल्या आहेत.

खंडेश्वर साखर कारखान्यामध्ये सुद्धा अजित पवार यांनी घोटाळा केलेला आहे. सगळ्या कारखान्यांमध्ये जिथे जिथे अजित दादांनी घोटाळे केले आहेत. त्याची यादी घेणार आणि वीस लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. माझं वय जरी 90 असेल तरी देखील मी अजित पवारांच्या विरोधात येत्या निवडणुकांमध्ये प्रचारासाठी उतरणार आहे, असं शालिनीताई पाटील म्हणाल्यात.

ईडीच्या भीतीपोटी अजित पवार यांनी हे बंड केलेला आहे. ते भाजपच्या आश्रयाला गेलेले आहेत. सिंचन घोटाळ्याचे अजित पवार यांच्यावर इतके गंभीर आरोप आहेत. या सगळ्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत. भविष्यामध्ये ते सगळे पुरावे मी समोर आणणार आहे, असा इशाराच शालिनीताईंनी दिला आहे.

वसंत दादा पाटील यांच्यामध्ये काही होईल. वैयक्तिक वैचारिक मतभेद होते. मात्र तरीदेखील मी असं सांगेन की शरद पवार हे मुद्सद्दी राजकारणी आहेत. ते हुशार आहेत. पॉलिटिकली अलर्ट आहेत. 2024 मध्ये किंवा त्या आधीच ते या सगळ्यांचा हिशोब चुकता करतील, असा विश्वास शालिनीताई पाटील यांनी व्यक्त केला आहे.