पवारांचा फोटो कुणी वापरायचा?; राष्ट्रवादीच्या दोन गटात वाद, शरद पवारांनी सुनावलं, म्हणाले, माझा फोटो…

Maharashtra Political Crisis 2023 : शरद पवारांचा फोटो वापरण्यावरून राष्ट्रवादीत वाद; खुद्द पवारांनी सुनावलं, म्हणाले...

पवारांचा फोटो कुणी वापरायचा?; राष्ट्रवादीच्या दोन गटात वाद, शरद पवारांनी सुनावलं, म्हणाले, माझा फोटो...
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 10:37 AM

मुंबई : राष्ट्रवादीतील दोन गटांमधील मतभेद आता वाढत आहेत. अशातच आता शरद पवार यांचा फोटो बॅनर्स, कार्यालय अथवा अन्य ठिकाणी वापरण्यावरून वाद निर्माण झाला आहे. यावर खुद्द शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझे फोटो वापरू नका, असं शरद पवार यांनी अजित पवार गटाला थेट सुनावलं आहे. तर जितेंद्र आव्हाडांनीही अजित पवार गटावर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादीतील बंडखोर गटाविरोधात शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शरद पवारांनी अजित पवार गटाला सुनावलं आहे. माझ्या विचारांशी द्रोह करणाऱ्यांनी माझा फोटो वापरू नये. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या पक्षानेच केवळ माझा फोटो वापरावा, अशा सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत.

राष्ट्रवादीचे नेते, जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला टोला लगावला आहे. शरद पवारांचे फोटो वापरण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे फोटो वापरा. शरद पवारांचे विचार तुम्ही सोडले. त्यांच्या विचारांना नाकारत भाजप सोबत गेलात. मग त्यांचे फोटो कशाला वापरता?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.

राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर शरद पवार यांचं भाषण ऐकताना जितेंद्र आव्हाड भावूक झाले. ज्यांनी पक्ष उभा केला. ज्यांनी तुम्हाला मोठं केलं त्यांचीच खुर्ची खेचता, असं म्हणत आव्हाड संतप्त झाले.

विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवार यांचा फोटो वापरण्यावर दावा केला आहे. शरद पवार आमच्या हृदयात आहेत. त्यांचा फोटो आम्ही वापरणारच, असं मिटकरी म्हणाले आहेत.

आज एमआयटी या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. अजित पवारांनी ही बैठक बोलावली आहे.या शक्तिप्रदर्शनात किती आमदार व्यासपीठावर उपस्थित राहतील याने निश्चित होणार अजित पवार यांना किती आमदारांचे समर्थन आहे. या अनुषंगाने संपूर्ण मुंबईत विशेषता बांद्रा परिसरामध्ये मोठ मोठे होर्डिंग आणि बॅनर्स पोस्टरबाजी करण्यात आली आहे. अजित पवार असलेल्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो आणि घड्याळाचं चिन्ह वापरण्यात आलं आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि नेते यांच्यात संभ्रम कायम आहे.

शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. वाय बी चव्हाण सेंटरला दुपारी 1 वाजता राष्ट्रवादीची बैठक होणार आहे. या बैठकीला 12 आमदार उपस्थित राहतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र प्रत्यक्ष बैठकीत किती लोक उपस्थित राहतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.

अजित पवार यांनी आज भुजबळ सिटीत मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्याला येण्यासाठी सर्व आमदार आणि खासदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. या बैठकीला 41 आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र प्रत्यक्षात किती आमदार उपस्थित राहतात हे पाहणं महत्वाचं आहे.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.