5 राज्यांच्या निवडणुकीत जिंकण्याचा भाजपनं दावा करणं म्हणजे मोठा विनोद; संजय राऊत यांनी खिल्ली उडवली
Shivsena Leader Sanjay Raut on BJP PM Narendra Modi Assembly Election Result 2023 : चार राज्यांच्या मतमोजणीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची सविस्तर प्रतिक्रिया.... निवडणुकींच्या निकालांवर बोलताना भाजपवर थेट निशाणा, म्हणाले...
मुंबई | 03 डिसेंबर 2023 : तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा आज निकाल लागतोय. या निवडणुकीत जिंकण्याचा विश्वास भाजपकडून व्यक्त करण्यात येत आहे. यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. पाचही राज्यात जिंकण्याचा भाजपने दावा केला असेल तर ते एक विनोद म्हणून आपण घ्यायला पाहिजे. यावर्षी मिझोराममध्ये भारतीय जनता पक्ष कुठे औषधालाही दिसत नाहीये. तिथे नॅशनल फ्रंट किंवा इतर काही स्थानिक पक्ष आहेत. त्यांच्या निवडणुकांमध्ये त्यांचा वारवा आहे एकदा ते निवडून येतील, असं संजय राऊत म्हणाले.
राजस्थानच्या निकालावर राऊत म्हणाले…
राजस्थानमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळतेय. यावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजूनही निकाल स्पष्ट नाहीये. हा सुरुवातीचा कल आहे. पाच राजाच्या निवडणुका आहेत. यामध्ये मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तेलंगणामध्ये काँग्रेस पक्षाचा वीजय होईल. छत्तीसगडमध्ये देखील काँग्रेसचं राज्य कायम राहील. मिझोराममध्ये तिकडील प्रादेशिक पक्ष सत्तेवर येईल. हे तीन निकाल सोडले तर राजस्थान आणि मध्य प्रदेश मध्ये खूप मोठी टक्कर होईल, असं संजय राऊत म्हणाले.
“इथं भाजपचा पराभव अटळ”
आता जे समोर आहेत ते कल आहेत. त्याला आपण ट्रेन्स म्हणतो. आधी आलेले हे ट्रेन्स अनेकदा ट्रेन्स कायम राहतात. नाहीतर राहत नाहीत. आम्ही बिहारला हे पाहिलं आहे. यात दोन पैकी एका राज्यात मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपचा पराभव होईल. याची आम्हाला खात्री आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
“छत्तीसगडमध्ये काँग्रेसच सरकार बनवणार”
छत्तीसगडमध्ये काँग्रेसच सरकार बनवणार आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये यावेळी संघर्ष आहे. जोरदार लढाई आहे काँग्रेस आणि भाजपमध्ये जर या दोन राज्यांमध्ये यश मिळालं. तर त्याचं श्रेय मोदी किंवा अमित शाह यांना नसेल ही शक्यता मला कमी दिसत आहे. त्याचं श्रेय असेल मध्य प्रदेशचे शिवराज सिंग चौहान- मामाजी आणि राजस्थानमध्ये महाराणी आपल्या वसुंधरा राजे शिंदे या दोघांमुळे तिकडे यश मिळू शकेल. पण तेही मिळालं तर… आता मला काही सांगता येत नाही, असंही राऊत म्हणालेत.