जर राष्ट्रवादीसोबत नसेल, तर भाजपला हरवण्यासाठी ठाकरे गटाचा प्लॅन बी रेडी?; सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती

Shivsena Uddhav Thackeray Group Plan For Loksabha Election 2024 : ठाकरे गटाने एक हाती भाजपला हरवण्यासाठी कंबर कसली; राष्ट्रवादीसोबत नसल्यास प्लॅन बी काय? कोणती रणनिती वापरली जाणार? आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय घडतंय? वाचा...

जर राष्ट्रवादीसोबत नसेल, तर भाजपला हरवण्यासाठी ठाकरे गटाचा प्लॅन बी रेडी?; सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती
Follow us
| Updated on: Aug 16, 2023 | 4:14 PM

मुंबई 16 ऑगस्ट 2023 : 2024 ची लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून यावेत यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. राजकारण आणि निवडणुका म्हटलं सगळेच पक्ष शक्यता लक्षात घेता आखणी करतात. प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी तयार करतात. त्यानुसार ते निवडणुकांची तयारी करतात. आता महाराष्ट्रातील राजकीय स्थिती पाहता सगळेच पक्ष सावध भूमिका घेत आहेत. त्यातच अजित पवार यांनी भाजपची साथ दिल्याने महाविकास आघाडीत संभ्रमाचं वातावरण आहे. त्यातच शरद पवार हे देखील अजित पवार यांच्या पाठिशी उभे राहू शकतात. त्यांच्या भूमिकेचं समर्थन करू शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आपला प्लॅ बी रेडी केला असल्याची माहिती आहे.

शरद पवार सोबत न आल्यास काय होणार?

राष्ट्रवादीत सध्या फूट पडली आहे. अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पाहायला मिळत आहेत. पण शरद पवार यांचा अजित पवार यांना छुपा पाठिंबा असल्याचं बोललं जातंय. शरद पवार आणि अजित पवार यांच्या वारंवार होणाऱ्या भेटी या चर्चांना हवा देत आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाने रणनिती आखल्याची माहिती आहे.

शरद पवार यांनी अजित पवारांच्या भूमिकेचं समर्थन केलं. तर शिवसेना ठाकरे गट वेगळी भूमिका घेऊ शकतो. 2019 ज्या ठिकाणी भाजपचे खासदार निवडून आले आहेत. त्या मतदारसंघात ठाकरे गटाने चाचपणी सुरु केली असल्याची माहिती आहे. जिथे शिंदे गट आणि भाजपचा अधिक प्रभाव आहे तिथे युतीच्या उमेदवारांना टक्कर देण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सध्याची राज्यातील राजकीय स्थिती पाहता शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट विरूद्ध ठाकरे गट- राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस अशी लढत होण्याची शक्यता आहे. तर शरद पवार यांच्या भूमिकेवर जरी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असलं तरी अजित पवार यांच्यासोबतची भेट ही कौटुंबिक आहे. तसंच भाजपसोबत आम्ही जाणार नाही, असंच शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे येत्या काळात राज्याच्या राजकारणात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असेल.

Non Stop LIVE Update
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.