Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्यामागे संजय राऊत नावाचा ब्रँड, म्हणून मला 100 कोटींची ऑफर; सुनील राऊत यांचं मोठं वक्तव्य

Sunil Raut on Sanjay Raut and 100 Crore Offer : संजय राऊत नावाचा ब्रँड, अन् 100 कोटींची ऑफर; शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.

माझ्यामागे संजय राऊत नावाचा ब्रँड, म्हणून मला 100 कोटींची ऑफर; सुनील राऊत यांचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Aug 30, 2023 | 9:12 AM

मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. सुनील राऊत यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. मला याआधी शंभर कोटींची ऑफर होती आणि आज सुद्धा मला ऑफर आहे. कारण मी स्वतः आमदार आहेतच पण माझा ब्रँड संजय राऊत माझ्यामागे असल्यामुळे मला देखील शंभर कोटींची ऑफर आहे, असं सुनील राऊत म्हणालेत. अशा कितीही ऑफर आल्या तरी आम्ही आमचा विचार बदलणार नाही. शंभर कोटी घेऊन माझ्यासारखा निष्ठावंत शिवसैनिक बदलणार नाही, असंही सुनील राऊत म्हणालेत.

संजय राऊत यांनी भाजपसमोर जर गुडघे टेकले असते. तर ते साडेचार महिने जेलमध्ये गेले नसते. पण त्यांना ते कधीही मान्य नव्हतं. ते जेलमध्ये असतानाचे त साडेचार महिने माझ्या घरच्यांनी कसे काढले हे फक्त आम्हालाच माहिती आहे. सगळं काही सहन केलं परंतु आम्ही पक्ष सोडला नाही. सोडणारही नाही, असं सुनील राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

आमचीच माणसं विकत घेऊन जातात. आमच्याच माणसांना आमच्यासमोर उभं करतात. मला एकही रुपयाचा फंड सरकारकडून मिळत नाही. माझ्यावर 35 कोटींचं कर्ज आहे. 35 कोटींची काम केली पण सरकार मला पैसे देत नाही, असा आरोप सुनील राऊत यांनी शिंदे सरकारवर केला आहे.

माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी शिंदे गटात प्रवेश केला तेव्हा त्यांनी सुनील राऊत यांच्याशी आपलं पटत नसल्याचं सांगितलं. आम्ही एकत्र आहोत. एकत्र असणार आहोत. मला सुनील राऊत यांच्या काही गोष्टी पटल्या नाहीत. मला शिंदे गटाकडून चांगली ऑफर होती. लोकांच्या सेवेसाठी मी प्रवेश केला आहे. सुनील राऊत यांनी मला कामात अडथळा आणला नाही. मला निधी कमी पडत होता. म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला आहे, असं उपेंद्र सावंत सांगितलं. त्याला सुनील राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

10 दिवसांपूर्वी उपेंद्र सावंत मला म्हणाला की, मला सुद्धा ऑफर आहे. निधी करिता 15 कोटी आणि पाच कोटी कॅशची ऑफर आहे. त्यावेळी तो मला म्हणाला मी निष्ठावंत आहे मी घरी बसेल पण मी शिंदेगटात जाणार नाही. नंतर मी त्याला खूप फोन केले. पण त्याने माझे फोन घेतले नाहीत. नंतर मी त्याच्या बहिणीला फोन केला आणि मी तिला म्हणालो की मी नसतो तर तो आज जेलमध्ये असता…, असं सुनील राऊत म्हणालेत.

माझ्याकडे त्याच्या चार ते पाच क्लिप आशा आहेत की त्या जर मी सोशल मीडियावर टाकल्या तर तो आपल्या मुलीला आणि बायकोला तोंडदेखील दाखवणार नाही. परंतु अशा गोष्टी करणे योग्य नाही हे आम्हाला कळतं. मी उद्धव साहेबांना फोन लावला आणि त्यांना एक मेसेज पाठवला पंधरा कोटीचा फंड आणि पाच कोटी कॅशवर उपेंद्र सावंत पक्ष सोडून चालला आहे, असंही सुनील राऊत म्हणाले.

'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर
'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर.
'कराड पेक्षा मोठा आका',धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल
'कराड पेक्षा मोठा आका',धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल.
सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण 'खोक्या' प्रयागराजला पोहोचलाच कसा?
सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण 'खोक्या' प्रयागराजला पोहोचलाच कसा?.
आईनेच 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर...
आईनेच 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर....
'तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही', रवींद्र धंगेकरांना कोणाचा इशारा?
'तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही', रवींद्र धंगेकरांना कोणाचा इशारा?.
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट.
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण...
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण....
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्.
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल.
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी.