मुंबई | 05 ऑक्टोबर 2023 : अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पवार कुटुंबाची भूमिका काय असेल? असा प्रश्न चर्चेत राहिला. अजित पवारांच्या या निर्णयाने पवार कुटुंबाचा राजकीय विचार दोन भागात विभागला गेला. अजित पवारांनी शरद पवारांच्या राजकीय भूमिकेविरोधात जात भाजपला साथ दिली. तेव्हा घडलेला प्रसंग खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितला. शरद पवारांच्या भावांची काय भूमिका होती? त्यांनी, यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. तसंच भाजपने जनतेसमोर राष्ट्रवादीची माफी मागावी, असंही त्या म्हणाल्या. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी या बाबींवर भाष्य केलंय.
अजितदादांनी जेव्हा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पवारांच्या भावांनी त्यांना फोन केला आणि सांगितलं, तुला लढायचं आहे. यांचं वय आहे 83 84 85… या वयात ही भावंडं एकमेकांना फोन करतात आणि सांगतात की, तू लढ… 75 वर्षांचे प्रतापराव पवार हे वयाने पवारसाहेबांपेक्षा लहान आहेत. ते फोन करतात अन् म्हणतात, तुम्हाला लढायचं आहे. त्यामुळे यांच्या आईने यांना काय खाऊ घातलं हे माहिती नाही. आजही हे सगळे लढण्याची भाषा करतात. कोणत्याही परिस्थितीला शरण जात नाहीत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पहाटेच्या शपथविधीविषयी जेव्हा प्रश्न विचारण्याता आला. तेव्हा हा आमचा दोष नाही. तर याविषयी अजित पवारांना सांगायला हवं. आम्ही 11 वाजता शपथ घेतो. ते सकाळी सातला शपथ घेतात. आम्ही 11 वाजता शपथ घेतो. पण इतर वेळी लोकांसाठी आम्ही सकाळी साडे सहालाच तयार असतो, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या पक्षावर टीका केली. आमच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांनी ते आरोप सिद्ध करून दाखवावेत. तसं नसेल तर त्यांनी देशाच्या जनतेसमोर राष्ट्र्वादीची माफी मागायला हवी. राष्ट्र्वादीवर केलेल सर्व आरोप राजकीय हेतूने केले होते, हे देखील स्पष्टपणे सांगावं, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंज दिलं आहे.